दिंडी
🚩🚩 दिंडी 🚩🚩
Guest author - मोहिनी पाटनुरकर (राजे)
घरचा दिवाळी सण आटोपल्यावर आम्ही चारही बहिणी माहेरी आलो......सगळ्या जणी जातात तशा.
हा आमचा दर दिवाळी चा कार्यक्रम आहे. आम्ही आणि माहेर दोन्हीही एकमेकांची वाट बघत असतो.
माहेरी आलो आणि दुसऱ्याच दिवशी रामप्रहरी दुरून मृदंग आणि टाळ वाजवल्याचा आवाज आला, सोबतच काही जणांचा भजनाचा पण सूर ऐकू आला.
'ती'आमच्या गावातली 'दिंडी' होती.
एका विशिष्ट देवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या तीर्थक्षेत्री किंवा मंदिरी, दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग,भजने गात नामस्मरण करीत पायी जाणार्या लोकांच्या जमावाला दिंडी म्हणतात.
कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे.
दिंडी दिसली कि आपसूकच आम्ही बहीणभाऊ आमच्या बालपणात हरवतो. दिंडी बघता बघता लहानपण आठवतो.
कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा दिंडीचा कालावधी असतो.
एका मंदिरातून सुरुवात करून आमच्या पूर्ण परिसरात फिरून ही दिंडी त्याच मंदिरात शेवट करते. कार्तिक महिना असतो हा. पहाटे पहाटे बऱ्यापैकी थंडीला सुरुवात झालेली असते.
मंदिरात काकडआरती करून सुरुवात होते, परिसरातले मुख्य रस्ते फिरून परत पहिल्या जागेवर येऊन सगळे आपापल्या मार्गी लागतात.
अगदी लहानपणापासून ही दिंडी मी पहात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या असायच्या, दिंडीचा आवाज ऐकला की आम्ही बहीण-भाऊ शाल लपेटूनच दारासमोरच्या पायरीवर येऊन दिंडी पहात असू, ती पुढच्या वळणावर दिसेनाशी होईपर्यंत बघत बसू, आणि पुन्हा पांघरूण घेऊन झोपत असू, खूप मज्जा वाटायची या दिंडीची.
सगळीकडे बदल झाला पण एवढ्या वर्षात दिंडीचे स्वरुप तसेच आहे. आणि दरवर्षी बघूनही दिंडी बघण्यातली आम्हाला वाटणारी गंमत कधीही कमी झाली नाही.
लहान थोर दिंडीत सामील व्हायचे, बायका मुलं पण.
लहान मुलं तर खूप उत्साहात असायचे.
थंडी असूनही कोणाच्याही अंगावर स्वेटर,शाल पाहिली नाही मी. पायात चप्पल नसते त्यांच्या, आम्हाला प्रश्न पडायचा यांना थंडी वाजत नसणार का?
कि दिंडीतूनच ऊब मिळते त्यांना.
कोणत्याही जात- पात, पंथ यांचा अडथळा नसतो दिंडीला.
किती वर्षे झाले या प्रथा परंपरेला , माहीती नाही, माहेरी आलो की अगदी आवर्जून बघतो आम्ही दिंडी, अगदी लहान असल्यागत्.
पांढरे कपडे, पांढरी टोपी, कपाळी टिळा, गळ्यात तुळशी माळ असा साधासा पेहराव त्यांचा. एकाच्या हातात भगवा झेंडा, एका हाती दिव्याचं ताट, एका हाती पाण्याची घागर.
मृदंग टाळ वाजवत भजन गातात. किती लयीत असते त्यांचे भजन !
मधेच एखादी ओळ उंच स्वरात तर एखादी ओळ हळूवार म्हणतात.
गाण्याचे शिक्षण न घेता, खुपसा सराव न करताही किती सुरात असते ते भजन, वातावरण एकदम भारावून जायचे.
एकदम सर्वत्र प्रसन्नता यायची.
जितके गाव लहान तितके प्रथा, परंपरा, संस्कृती जास्त जोपासल्या जातात. मोठ्या शहरात प्रथांचा अर्थ जोपासण्यापेक्षा त्याचे अवडंबरच जास्त.
लोकं प्रथा,परंपरेतही स्पर्धा आणतात.
दिंडी म्हटलं की हा उल्लेख होणं आवश्यक आहे, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव इत्यादी संत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत. त्यांच्या हाती ध्वज, पताका असायचे ही मिरवणूक म्हणजेच 'दिंडी'.
शहारासारखं कोणीही इकडे आवाजाने झोपमोड झाली म्हणून तक्रार किंवा किरकिर करत नाही.
तिची वेळ झाली की लोकं आपापल्या घरातून, खिडकीतून डोकावून ती दिसेनाशी होईपर्यंत बघतात आणि दिवस आनंदात घालवतात, अजूनही........
दिंडीत असणाऱ्या उत्साही लहान मुलांना बघून पुढचा वारसा चालू राहणार याची खात्री वाटते.
आम्ही लहानपणी जी 'दिंडी' अनुभवली ती आमची मुलेही आमच्यासोबत बघतात. पण अनुभवत नाही , याची खंत वाटते.
इतके वर्ष झाले दिंडी बघून , पण अजूनही ते दिवस आठवले की लांबून कुठूनतरी
' ओवाळा ओवाळा माझ्या सावळ्या राया, माझ्या पंढरी राया.......' हे सूर, मृदंग टाळ चा आवाज एक वेगळ्याच लयीत, कानात घुमतो.......आणि आमचे बालपण फिरुन आम्हाला मिळाल्याचा भास होतो.....
Blog आवडला असेल तर
Please subscribe.
धन्यवाद विशाखा
ReplyDelete........मोहिनी
सौ.मोहिनी शैलेश पाटणुरकर,वहिनी,
Deleteसर्व प्रथम तुमचे मनःपुर्वक अभिनंदन,अत्यंत जिव्हाळ्याचा "दिंडी" हा विषय आणि बालपणातील त्या रम्य आठवणींचे तुंम्ही अत्यंत वस्तुनिष्ठ शब्दांकन केले आहे.कोणत्याही परिस्थःतीत तुंम्ही स्वःत जो पर्यन्त समरस होत नाही तो पर्यन्त त्याची भावना,महत्व,जाणुन घेता येत नाही.महिलांनी,मुलींनी त्यांचे डोक्यावर दिंडीत तुळशी वृृृृंदावन घेउन जाणे हा त्यांचेसाठी सर्वोच्य सन्मान असतो.याला आजही तोड नाही.दिंडीतील भाविक हे अत्यंत तल्लीन होउन,अत्यंत निस्वार्थी भावनेने,सेवारत होतात.तेथे सर्वजण समान असतात.हिच भावना खुप प्रेरणादायी आहे.सर्व प्रापंचीक सुख बाजुला ठेउन स्वतः मध्ये आनंद शोधतात आणि तो त्यांना माउलीच्या रूपाने मिळतो ही.यातच त्यांचे सर्व सार्थक होते.
तुमचा हा अप्रतिम लेख वाचुन मी,ही कांही वेळासाठी या "दिंडी" मध्ये समरस झालो आणि मनस्वी आनंद मिळाला.
धन्यवाद.
आपल्या लेखास खुप खुप शुभेच्छा.असेच अप्रतिम लेख वाचनास मिळो हिच सदिच्छा.
महेश श्रीनाथ बोर्डे,
टिळकनगर,नांदेड
मोहिनी हुबेहूब वर्णन केले दिंडीचे.
ReplyDeleteमोहिनी .... किती छान लिहले लहानपणी बघितलेली दिंडी डोळ्यासमोर उभी राहिली
ReplyDeleteलहान असताना दिंडीमधील डोक्यावरील तुळस
ReplyDeleteआणि कलश
पाहीली की ही स्त्री डोक्यावरील तुळस
आणि कलश कशी
सांभाळत असेल चे कुतुहल वाटायचे
दिंडी चे वर्णन brilliant .......
.........keep it up dear
Hahhh hahahaha . Kiti sunder varnan keles .. mohini ..
ReplyDeleteAse vatale .. mi swataha tithe hote . Ki kai asech vataytay...
Keep it up ..Swati Kurse
Thanks swati
DeleteMast. ...nice description & superb therotical explanation.
ReplyDeleteKEEP IT UP
कोणत्याही गत स्मृतींना उजाळा देणे आणि त्याचे हुबेहूब वर्णन करणे व ते कागदावर रेखाटने हे एक अतुलनीय कौशल्य आहे जे तथाकथित कथा लेखकांना आणि साहित्यिकांना जमायचे आज चे संगणकीय युग माध्यमे बदलली त पण ऊर्मी अजूनही तुझ्या सारख्या लेखका त आहे ही कुतुकाची बाब आहे त्यात ही एका गृहिणीने असे लेखन करावे अभिनंदनीय खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteआपण वेळात वेळ काढून लिखाण वाचलेत आभारी आहे. कौतुकासाठी धन्यवाद.
आपली प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा 🙏
Khup chaan
ReplyDelete