Posts

शब्दपर्ण

Image
 टीममध्ये आपले स्वागत आहे. एका छोट्या ब्लाॕगपासून सुरु झालेला प्रवास केवळ तुम्हा वाचकांच्या प्रतिसादामुळे 'शब्दपर्ण' वेबसाईटपर्यंत पोहचला. लोग मिलते गये,कारवाँ बढता गया.... प्रमाणे आधी एकटीने सुरु केलेल्या लिखाणाच्या प्रवासात मित्रमैत्रिणी सहभागी होत गेले.   वाचक  बनलेले नंतर ह्याच वेबसाईटवर लेखकही बनले. दर्जेदार लिखाण घरोघरी पोहचवण्याचा 'शब्दपर्ण' टीमचा प्रयत्न असणार. लिहिते व्हा.... शब्दाचे दान सगळ्यांच्याच पदरी पडत नाही. ज्यांना ते मिळाले त्यांनी लेखन करायलाच हवे. आपण लिहिले तरच आपल्या लिखाणात ताकद आहे,जादू आहे हे उमजते. आमच्या ह्या प्रवासात  आम्हाला अशाच' लिहिते व्हा' म्हणणाऱ्या आमच्या सारख्या वाटसरुंची गरज आहे. अट एकच..लिखाण दर्जेदार असावे. खरे म्हणजे शब्दाचे मोल करता येत नाही. पण फुल ना फुलाची पाकळी.... लिखाणाला views नुसार मानधन देण्यात येईल. (मानधन आपली साईट monetize झाल्यानंतर देण्यात येईल.पण views तुमच्या  पहिल्या लिखाणापासूनच count होतील.) इथे लिखाण मुक्त असेल,लेखणीला बंधने नाहीत. फक्त कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याचे भान

महिलादिन विशेष

Image
 समाज व्यवस्थेत स्त्रीच्या हुशारीला तिच्यातील कलागुणांना अफाट बुद्धिमत्तेला तिच्या अस्तित्वाला दुय्यम स्थान देऊन समस्त स्त्री जातीवर कित्तेक वर्ष अन्याय केला आणि म्हणूनच एक द्रष्टया व्यक्तीने म्हणजेच आंबेडकरांनी केले .  समाजविघातक अनेक रूढी परंपरांना तिलांजली दिली महिला विधेयक मंजूर करून समस्त स्त्रीजातीला सन्मानित केले आणि तिला उडण्याचे बळ दिले. " स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी." असे हृदयात अमृताचा झरा घेऊन जगणारे एक अस्तित्व समाजातील काही धर्ममार्तंडांनी त्यांना त्यांच्या विकासाची दारे बंद केले खरंच कधी कधी माझ्या मनात विचार येतो त्या काळातही बुद्धिमत्ता असणारच पण त्यांना माणूस म्हणून फुलण्याचे विकसित होण्याची अधिकारच नाकारले होते. पिढ्यानपिढ्या तिचे विश्व म्हणजे फक्त रांधा वाढा उष्टी काढा ..आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी लागणारे सर्व गुण ठासून भरलेले असताना देखील तिला पुरुषप्रधान संस्कृतीने कधीही तिचे माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार दिले नाहीत त्यामुळे समस्त स्त्री जातीचे खूप नुकसान झाले पण त्याहून अधिक समाजव्यवस्थेचे झाले कित्येक  बुद्धिमान स्त्रिया अशाच ज

गृहिणींचा प्रजासत्ताक

Image
  वाचक मंडळी १ फेब्रुवारी पासून रहस्यकथा आणत आहोत. वाचकांपैकी कुणाला लिहायच्या असल्यास कृपयाआमच्या इमेलवर पाठवा. gajbhiye.preeti1972@gmail.com ) गृहिणींचा प्रजासत्ताक मोबाईलवर  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा एक दिवस आधीच झळकू लागल्या . आणि माझी म्हणजे एका गृहिणीची धावपळ सुरू झाली .  मुलांचे गणवेश स्वच्छ धुवून कडक इस्त्री करणे , बुटांना पाॕलीश करून ठेवणे , नवरोबाचे पांढरे शुभ्र शर्ट  तयार ठेवणे,  त्यांनाही विविध क्लब , बँक , शाळा ईत्यादी ठिकाणी झेंडा वंदन साठी जायचे असते . तसे माझेही विविध महिला मंडळ, अनाथ आश्रम, कुष्ठधाम , ईत्यादी ठिकाणी झेंडा वंदन , सामाजिक ऊपक्रम अंतर्गत फळे,बिस्किटे,वह्या वाटप करणे , अशा कार्यक्रमामुळे  माझीही तयारी करावी लागते . जसे,   पांढरी सुती साडी  तिरंगी बांगड्या , फुलांचा शुभ्र गजरा अशी खास तयारी. त्यासाठी मी ताज्या शुभ्र कुंदकळ्यांचा गजरा माळीत बसले , सकाळी उशीर होऊ नये म्हणुन एक दिवस आधीच कामे आटोपणे सुरू होते   इतक्यात मोबाईल चाळत बसलेला धाकटा म्हणाला  " अग आई !पहा न हा फ्रीडम फायटर्सचा व्हिडिओ " मुले सध्या शुद्ध मराठीत नव्हे तर मिग्लिश बोलतात ,

समर्पण-९

Image
विषय एक कथा अनेक  या कथामालिकेत यावेळी विषय आहे समर्पण....   समर्पण कथा क्र.९ बापू आणि मंजुळा यांना सहा अपत्ये. ते दोघे मुंबईत राहायचे. काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यातलीच एक 'लक्ष्मी' .  तिला घरात सर्वजण बचाबाई म्हणायचे. गावाकडे असतानाच म्हणजे बचा चौथीला असतानाच आई-बाबांनी तिचं लग्न लावून दिलं. त्या बालवयात लग्न म्हणजे काय हे सुद्धा त्या खेळकर, अल्लड, निरागस आणि निर्व्याज्य मुलीला कळत नव्हते.  त्या काळात म्हणजे 1950 ते 55 च्या काळातील जागर हाटी प्रमाणे मुलींचे सर्रास बालविवाह होत असत. त्याच नियमाने लक्ष्मीचे लग्न झाले. चौथीच्या वर्गात बसलेली असताना तिची आई एक दिवस शाळेत लक्ष्मीला म्हणाली, " लक्ष्मी घरी चंल तुला बघायला पाहुणे आले आहेत...."  लक्ष्मीन आपल् पाटी-पुस्तक घेतलं आणि आईच्या हाताला धरून चालू लागली. रस्त्याने चालताना ती आईला म्हणाली, " आई पाहून बघायला आलेत म्हणजे काय ग...?"  त्यावर आई म्हणाली, " अग आता तुझं लग्न होणार...." तिचा पुन्हा बाल प्रश्न, " आई लग्न म्हणजे काय....? सांग ना....."  त्यावर आई तिला म्हणाली, &qu

छळतो आभास हा.....

Image
आज संध्याकाळी चित्रकार  मानसच्या चित्रांचे प्रदर्शन  होते.पेपरमध्ये  जाहिरात बघितली आणि  घाईघाईने सुखदा आॕफिसमधून जिथे प्रदर्शन होती तिथे जायला निघाली. काय सांगावे चित्रकार मानस येतील थोड्या वेळासाठी. मला उशीर झाला तर ..... नाही आज मला त्यांना  बघायचेच आहे . या विचारानेच तिचे अंग शहारले.आॕफिसबाहेर आली पट्कन रिक्षा पकडली.  जल्दी चलो. रिक्षावाल्याला पत्ता देत सुखदा बोलली. रिक्षावाल्याने रिक्षाचा वेग वाढवला. सुखदाने पर्समधून मानसचे चित्र काढले त्याचे हळूवार एक चुंबन घेतले.आणि  एकटक त्या फोटोकडे बघत बसली. आॕफिस सुटल्यावर हे तिचे रोजचेच काम झाले होते.   उतरो मॕडम, टाईमपें पहूँचाया आपको! त्याचा आवाज ऐकून सुखदाने घाईनेच पण सांभाळून तो फोटो पर्समध्ये ठेवला. ती रिक्षातून उतरली आणि पळतच प्रदर्शन असलेल्या हाॕलकडे निघाली. मानससाठी होणारी तगमग फक्त तिची तीच  जाणत होती.    सुखदा हाॕलमध्ये पोहचली.जिकडेतिकडे  मानसच्या कुंचल्यातून उतरलेली अद्भूत चित्रे लावली होती.सुखदाची नजर  चित्रे बघताबघता मानसचा शोध घेण्यासाठी भिरभिरत   होती.  न राहवून बाजूलाच एका चित्र बघण्यात गुंग झालेल्या पुरुषाला तिने विचारले. च

अद्भुत जग---कथा क्र.-१०

Image
वाचक मंडळी,  विषय एक कथा अनेक या आमच्या कथामालिकेत आम्ही नविन विषय घेऊन आलो. अद्भुत  जग--- या विषयावर  पूर्णपणे काल्पनिक असलेल्या कथा आहेत. वादातीत असलेल्या या विषयावर लिहितांना एक गोष्ट जाणवली.काल्पनिक असले तरी लिहितांना अद्भूतता आणि थरारकता स्पर्शून जाते. अर्थात वाचकांच्या सुचनांचे स्वागत आहेच. अद्भुत जग---कथा क्र.-१० वसुधा खूपच आनंदी होती कारण ही तसेच होते. आज तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता, आजपासून ती आत्मनिर्भर होणार होती आणि त्याचा आनंद  गगनात मावत नव्हता. तिने आणि तिच्या आईवडिलांनी सोसलेल्या अपार कष्टाचे यश आज झाले होते .वसुधा झेडपीच्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होणार होती. ती एका गरीब आई बापाची एकुलती एक पोर होती.  रखमा आणि गणपा अशा ऊस कामगारांची वसुधा ही दिसायला अतिशय देखणी आणि बुद्धीने तेवढीच तल्लख. मनातल्या मनात रोज विचार करायची, आपण जसे आयुष्य जगतो तसे आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून दोघे नवरा-बायको रात्रंदिवस कष्ट करायचे. कारखाना जवळ एक शाळा होती , ते दोघे रोज कामावर जाताना वसूला (वसुधाला ते प्रेमाने वसू म्हणायचे ) ते तिला या शाळेत सोडून जायचे.  पा

अद्भुत जग---कथा क्र.-५

Image
वाचक मंडळी,  विषय एक कथा अनेक या आमच्या कथामालिकेत आम्ही नविन विषय घेऊन आलो. अद्भुत  जग--- या विषयावर  पूर्णपणे काल्पनिक असलेल्या कथा आहेत. वादातीत असलेल्या या विषयावर लिहितांना एक गोष्ट जाणवली.काल्पनिक असले तरी लिहितांना अद्भूतता आणि थरारकता स्पर्शून जाते. अर्थात वाचकांच्या सुचनांचे स्वागत आहेच. अद्भुत जग---कथा क्र.-५ सिद्धार्थ :  बसा न काका खुर्चीवर,  तुम्ही उभे का राहता नेहमी ? काका तुम्ही लाल शर्ट का घालता ?  दुसरे शर्ट नाहीत का तुम्हाला  ? माझ्या बाबांना विचारून त्यांचा शर्ट देईन मी तुम्हाला,     :   माझ्या बायकोला वीणाला लाल रंग खुप आवडतो. तिनेच आणला माझ्यासाठी हा शर्ट. सिद्धार्थ : मला पण आवडतो लाल रंग,  पण आई मला लाल रंगाचे कपडे घालु देत नाही . ती म्हणते तु गोरा आहे ना,  लाल कपड्यात तुला दृष्ट लागते.  तुम्ही डोक्यावर रोजच लाल रंगाची टोपी घालता ?    : तिनेच आणली होती माझ्यासाठी ही कॅप. सिद्धार्थ बैठकीच्या खोलीत कोणाशी तरी बोलत होता. सईच्या कानावर त्याचा आवाज आला म्हणुन ती बाहेर बघायला आली तर सिद्धार्थ खुर्ची कडे तोंड करून एकटाच बडबड करत होता. जेमतेम महिनाच झाला होता त्यांना या न

मनातली मोरपिसे---कथा क्र. ६

Image
वाचक मंडळी,  विषय एक - कथा अनेक. यावेळी विषय आहे जीवाला पिसे लावणारी---  मनातील मोरपिसे. मनातील मोरपिसे...शब्दातच किती मधुरता,मुलायपणा आणि तरलता जाणवते. प्रत्येकाच्या मनात किमान एकतरी मोरपीस  असते.जीवापाड जपलेले. ते मनातले मोरपीस पूर्ण  व्हावेच हा अट्टाहास नसतो पण पूर्ण झालेच तर त्यासारखी तृप्तताही नसते.  काहीजणांचे मोरपिसे फुलतात,काही जणांचे विरतात आतल्याआत. मनातली मोरपिसे-कथा क्र.६ गिरीश आणि निलिमा नवदाम्पत्य . त्यांच नुकतंच लग्न झालेलं . दोघेही स्वभावाने अगदी मनमिळावू.  विशेष म्हणजे त्यांच्या प्रेमाला घरी स्वीकारून लग्नबंधनात अडकले होते.  गिरीशच्या घरच्यांचाही स्वभाव सरळ आणि  साधी माणसं होती . म्हणजे निलिमाला  सासरी असल्याचे कधीच  जाणवत नसे. त्यांच्या लग्नाला महिना पालटला होता आणि आपल्या नवीन संसाराची स्वप्न ते रंगवत होते .  त्यांचे पहिले सगळे सण-समारंभ अगदी सुरळीत पार पडले .  असे आनंदाचे दिवस जात होते. गिरीशचे रोजचं रुटीन ठरलेलं, ऑफिस आणि निलिमाला वेळ देणे .  गिरीशला ऑफिस मधुन लवकर घरी  यावे आणि निलिमा सोबत वेळ घालवावा वाटे. निलिमाची घरकाम, वाचन वगैरे चालु होतं . असे करत त्यांचे गु

पूर्वसंकेत---एक गूढ

Image
फोन : मालती राणे, तुम्हीच का ? मकरंद राणे कोण तुमचे ?   मालती :  हो,  मुलगा,  का?  काय झालं ?    फोन :  लास्ट डायल तुमचा होता म्हणून फोन केला. त्यांना सिवियर हार्ट अटॅक आलाय. आम्ही ऑफिसमधून तडक हॉस्पिटलमध्ये नेतोय.  पण....... बहुतेक फोन कट झाला.  मालती : हॅलो .....हॅलो...... बहुतेक कायssss ? मालती ताडकन झोपेतून उठून बसली.  'बापरे!  किती भयंकर स्वप्न'.  तिला झोपेत सुद्धा दरदरून घाम आला होता. आठ दिवसात हेच स्वप्न तिला दोनदा पडले होते.  पहिल्या वेळेस तिने इतका विचार केला नव्हता.  पण आता तिने लगेच नवऱ्याला, मधुकरला सांगितले आणि लगोलग मकरंदची खुशाली  फोनवर  विचारली.  सगळं ठीक होतं.  तब्येत चांगली होती. कसलाही त्रास नव्हता.  मालतीला जरा हायसं वाटलं. मधुकर : मालती,  ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम असते,  काळजी असते , त्यांच्याचबद्दल आपल्या डोक्यात असे विचार येतात . काळजी नको करू त्याची.  उद्या शनिवार आहे वाटल्यास जाऊन भेटून ये. तुझी नात पण आठवण काढते तिकडे.  तुलाही बरे वाटेल. मला मात्र यायचा आग्रह करू नको.  तिकडे करमत नाही ग मला. मधुकर मालती राहतात कल्याणला आणि मकरंदने फ्लॅट घेतला होता

निरोप--- एक शाश्वत सत्य.

Image
निरोप शब्द ऐकला कि त्या शब्दाबरोबर आपसूकच एक दुःखाची छटा  असल्याचे जाणवते.  काही निरोप कायमचे  तर काही तात्पुरते असतात. निरोप म्हणजे दुःख.  निरोप म्हणजे  विलगता. निरोप म्हणजे विरह. निरोप म्हणजे वेदना. सीमेवर लढायला जाणाऱ्या नवऱ्याचा निरोप, मुलगा/मुलगी नौकरीसाठीसाठी घराबाहेर  पडतो तेव्हा घेतलेला निरोप, मुलीची सासरी पाठवणी करतांना  तिला दिलेला निरोप एखाद्याशी मनाचे धागे जुळत नाही म्हणून त्या नात्याचा घेतलेला निरोप. शालेय जीवन संपल्यावर शाळकरी मित्रांचा घेतलेला निरोप. आईवडील म्हातारे झाले म्हणून वृद्धाश्रमात त्यांचा घेतलेला निरोप.पण काही निरोप वेदना देणारे असले तरी नवीन जीवनाचा आरंभ करणारे असतात.  तर अशाच कुणालाही न आवडणाऱ्या 'निरोप' विषयावरच्या काही लघुकथा........                     लघुकथा १ साक्षीचे लग्न  जुळले आणि  रेवतीची झोपच उडाली  आपली  छोटीशी  परी  मोठी  झाल्याचे कळलेच नाही.काळ कसा पंख  लावल्याप्रमाणे वेगात निघून  गेला.खरेच काळ आणि  पक्षी  यांचा  वेग कधी कुणाला  कळणार  का?  रेवती भूतकाळात  डोकावू लागली. लग्नाला  पाच वर्षे  झाली तरी घरी पाळणा हलेना.रेवतीला आता घाई झाली होत

नाजूका भाग-२

Image
(नाजूका भाग १ चि लिंक http://gajbhiyepreeti72.blogspot.com/2020/09/blog-post_15.html) मास्तर बदली करुन दुसऱ्या गावाला गेले. त्यांच्या गावाजवळून हे गाव जवळ होते.रोज येणेजाणे करु शकत होते. बायको,मुले,आईवडील  यांच्यासोबत ते राहू शकत होते. मास्तरचा प्रपंच वाढला होता.गावात शेती होती.आईवडील लक्ष द्यायचे शेतीकडे. मास्तरला कधी कधी नाजूका आठवायची.  मी भीतीपोटी इकडे निघून आलो.नाजूकाचे काय झाले असेल? अजाण,अवखळ पोर तिचे आयुष्य नासवले मी. तिची किती बदनामी झाली असेल समाजात. मास्तरच्या डोक्यात असे विचार आले कि चक्रावून जायचे. स्वतःला दोष देत बसायचे. पण मी काय करु शकलो असतो.दुसरा उपायच नव्हता.  असे म्हणून स्वतःचा बचाव करायचे.  आयुष्य चालले होते.म्हातारपणामुळे वडील गेले.आता शेतीत मास्तरांना लक्ष घालवावे लागत होते. पाच वर्षांनी मास्तरांची परत दुसरीकडे  बदली झाली. हे गाव जरा लांब असल्यामुळे येणे जाणे करणे शक्य नव्हते.तिथे मास्तरने एक खोली भाड्याने घेतली.आठवड्यातून एकदा गावी येत होते. जीवन स्थिर होते. संथपणे चालले होते. नेहमीप्रमाणे मास्तर शनिवारची शाळा करुन आले आणि सोमवारी पहाटेच शाळेच्या गावी परतले.आता

नाजूका भाग - १

Image
आज वाड्याच्या शाळेत नवीन मास्तर येणार होते. जुन्या मास्तरची बदली दुसऱ्या गावाला झाली होती. जिल्हापरिषदची चवथीपर्यंतची शाळा. गावापासून जरा लांबच होती. आजूबाजूला गर्द झाडे आणि मध्ये छोटीशी शाळा. शाळेजवळच एक  एस.टी. स्टॕण्ड .ते पण छोटेच. गावच छोटे.त्या गावात येणेजाणे तरी कोण करणार?  सामानसुमान आणायचे असेल किंवा दवाखान्यात जायचे असेल तरच त्या एस.टी.ची गरज.उगाच  तिकिटवर पाच रुपये कोण खर्च करणार? शाळेत मुले कमीच राहायची. शाळेत जाऊन मुलांचे खूप काही भले होते हे मत कालबाह्य वाटावे अशीच त्या शाळेची परिस्थिती. मास्तरला घरोघरी जाऊन  पोरांना शाळेत या म्हणून विनवणी करावी लागायची. पण तरीही मास्तरला खूप मान द्यायचे सगळे. मुलाला एकदा शाळेत टाकले कि त्या मुलावर हक्क मास्तरचा. मास्तर म्हणजे शाळेचे सर्वेसर्वा. जुन्या मास्तरची पाच वर्षांनी बदली झाली होती. दोनेक महिन्यानंतर गावाला नविन मास्तर मिळाले होते. पंधरा,सोळा वर्षाची नुकतीच यौवनात पदार्पण केलेली नाजूका  रोज शाळेची साफसफाई करायला यायची. चवथीपर्यंत ती याच शाळेत शिकली होती. जुने म्हणजे बदलून गेलेले मास्तर शाळेच्या बाजूलाच खोली घेऊन राहायचे.नविन आलेल्या

इच्छामरण.....

Image
."".सांईहाॕस्पीटल""भव्य उदासवाणी इमारत ..बहुधा तशीच असते दवाखाना म्हंटल की ,,मोजुन त्या  बारा पायऱ्या ...न आवडणाऱ्या.   दुर्दैवाने या दोन वर्षात तिसरी खेप होती ....इथे येण्याची ...तो भयावह काॕरीडोर ..घाबरलेले ..नाऊमेद आस्थेवाइकांचे  चेहरे पाहुन आपसुकच  काही तरी सुटत़य हातच अस वाटत ..त्यात ही  रात्र ,ओढून ताणून पसरवलेला  अधिकच पांढरा शुभ्र प्रकाश ,जिकडेतिकडे भावशुन्य काम करणारी, कर्तव्य निष्ठ माणसे..... काॕरीडोरच्या शेवटापासून पहिल्या  चकचक चमकणाऱ्या  बाका वर .. पांढऱ्याशुभ्र राखाडी काठा च्या साडीतील  थोडी स्थुल पण बांधे सूद ,रेखीव ... पन्नास पंचावन्न वय  गाठलेली  ..पाठ टेकेवून ,डोळे मिटवुन,काहीशा हताश अवस्थेत बसलेली रोहिणी, (रवि ---मुलाचा प्रवेश) रवि : आई ,अग  आई ,तु बाहेर का बसलीस.बाबांजवळ बसायच न . ऱोहिणी : अरे त्यांचा डोळा लागला ..म्हणून जरा बाहेर आले ..एव्हाना तिथेच बसले होते ,जरा घाबरल्या सारख झाल, म्हणून बसले बाहेर. आणली औषधे सगळी ? समजावून  सांग मला कशी द्यायची ...मग गडबड झाली की ओरडा घालतोस तू. ऱवि: सांगतो ..(सगळ समजवुन सांगतो) मला जाव लागेल घरी ...तु थांब इ