भय इथले संपत नाही

माणसांना पिंजऱ्यात बघितले आहे का?
आज जगभरात घरोघरी पिंजऱ्यात माणसे अडकली आहेत.
पिंजरा उघडला कि पक्षी आकाशात भरारी घेण्याची धडपड करतो .
माणसांची पिंजरे उघडीच आहेत.ती त्यांनीच बनवली आहेत.
त्याला स्वतःलाच पिंजऱ्यात राहायचे आहे
पिंजऱ्याबाहेर जाण्याचे एवढे भय कशाचे?
मृत्यूचे? 
स्पर्शाचे?
जीवघेण्या करोनाचे?
अवकाशात भरारी घेणाऱ्या माणसाला करोनाने जमीनीवर आणले.(अक्षरशः  लोळवले)
सर्वत्र मृत्यूचे भय.
पिंजऱ्यात कोंडून घेण्याशिवाय पर्याय राहला नाही 
माणसाजवळ.
सर्वांना सोबत राहता यावे म्हणून सुट्टीची वाट बघणारे आपण
आज,उद्या,परवा सुट्टी असुनही किती अस्वस्थ आहोत
सर्व ठीक होईल असे मन समजवत आहे पण अंतर्मन मानायला तयार नाही.
उद्या काय हादरा बसणार या विचाराने अंतर्यामी  माणूस हादरला आहे.
उद्या कदाचित् आपण.....या विचारानेच थरकाप होतोय अंतर्मनाचा.
आपण सगळे सध्या एकाच अवस्थेतून जातोय 
भयाची अवस्था
   सैन्य  सीमांच्या रक्षणासाठी लढतात तेव्हा दोन पावलांवर असणाऱ्या
 मृत्यूचे भय त्यांना नसेल?
रुग्णाचा साथीचा रोग होऊन आपण कधीही मृत्यूला कवटाळू शकतो हे माहीत असूनही रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न  करणाऱ्या डाॕक्टरला 
मृत्यूचे भय नसेल?
आपण पिंजऱ्यात  सुरक्षित असतांना रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलीसांना 
मृत्यूचे भय नसेल?
साथीचा रोग वाढू नये म्हणून कचरा उचलायला येणाऱ्या सफाई कामगारांना 
मृत्यूचे भय नसेल?परदेशी गेलेल्यांना वापस मायदेशी आणणारे पायलट,एअर होस्टेस यांना
मृत्यूचे भय नसेल?
आज थाळी आणि टाळी वाजवतांना हे सर्व  डोळ्यासमोर तरळले.
या सर्वापेक्षा परमेश्वर वेगळा असेल का?
आपला पिंजरा हीच माणसे तोडणार आहेत.
बस् थोडी साथ आपल्याला द्यावी लागेल.
थोडा धीर ठेवावा लागेल.
  रात्र थोडी मोठी आहे पण संपणारी आहे. 
पहाट होणारच आहे.
'वो सुबह कभी तो आयेगी'

प्रीतीदिप

Comments

  1. वाहवा... सर्वांच्या अंतर्मनाचा ठव घेतलास.. खूप सुंदर.. अशीच लिहीत रहा.. शिरीष

    ReplyDelete
  2. छान ,सुंदर लेखांकन अगदी सर्वाच्या मनातल अव्यक्त अस लिहलस...👍👍👌 सुरेन्द्र बनसोडे

    ReplyDelete
  3. एकदम खरं आहे-आशिष

    ReplyDelete
  4. सद्ध्या परिस्थिती चे वास्तववादी अचूक वर्णन

    ReplyDelete
  5. छान , सुंदर लिहिलेय

    ReplyDelete
  6. Good content on the current situation

    ReplyDelete
  7. खुप सुंदर लिहले ग प्रत्येक मनाची घालमेल छान लिहिली

    ReplyDelete
  8. अगदी बरोबर ! अतिशय संवेदनशील.... हा लेख वृत्तपत्रात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हवा ...... आनंद

    ReplyDelete
  9. Vaishali joshi .....काही शब्दच नाहीत ....अंतर्मुख करून टाकलेस ....

    ReplyDelete
  10. उत्कृष्ट प्रासंगिक ! अंतर्मुख व्हायला भाग पडते आहे .

    ReplyDelete
  11. वा, छान साहित्यिक लिहिलस, एवढ सगळ छान सुचल, उतरवल

    ReplyDelete

Post a Comment