निरोप--- एक शाश्वत सत्य.

निरोप शब्द ऐकला कि त्या शब्दाबरोबर आपसूकच एक दुःखाची छटा  असल्याचे जाणवते. 
काही निरोप कायमचे  तर काही तात्पुरते असतात.
निरोप म्हणजे दुःख. 
निरोप म्हणजे  विलगता.
निरोप म्हणजे विरह.
निरोप म्हणजे वेदना.
सीमेवर लढायला जाणाऱ्या नवऱ्याचा निरोप,
मुलगा/मुलगी नौकरीसाठीसाठी घराबाहेर  पडतो तेव्हा घेतलेला निरोप,
मुलीची सासरी पाठवणी करतांना  तिला दिलेला निरोप
एखाद्याशी मनाचे धागे जुळत नाही म्हणून त्या नात्याचा घेतलेला निरोप.
शालेय जीवन संपल्यावर शाळकरी मित्रांचा घेतलेला निरोप.
आईवडील म्हातारे झाले म्हणून वृद्धाश्रमात त्यांचा घेतलेला निरोप.पण काही निरोप वेदना देणारे असले तरी नवीन जीवनाचा आरंभ करणारे असतात.
 तर अशाच कुणालाही न आवडणाऱ्या 'निरोप' विषयावरच्या काही लघुकथा........

                    लघुकथा १

साक्षीचे लग्न  जुळले आणि  रेवतीची झोपच उडाली 
आपली  छोटीशी  परी  मोठी  झाल्याचे कळलेच नाही.काळ कसा पंख  लावल्याप्रमाणे वेगात निघून  गेला.खरेच काळ आणि  पक्षी  यांचा  वेग कधी कुणाला  कळणार  का?  रेवती भूतकाळात  डोकावू लागली.
लग्नाला  पाच वर्षे  झाली तरी घरी पाळणा हलेना.रेवतीला आता घाई झाली होती.डाॕ कडे फेऱ्या  मारणे सुरू  होते.
जे कुणी  सांगेल ते...ते  सर्व  सुरू  असायचे.कुंदन तर पार वैतागून  गेला होता.
किती  घाई आहे रेवती तुला , अग होईल  न बाळ..फक्त  पाच वर्षे  तर झाली आपल्या  लग्नाला.
तुम्हाला  तर काही कळतच नाही हो.माझ्या  सर्व  मैत्रिणी  आई झाल्या.
रेवतीचे सुरू  असायचे..
होईल  न सर्व  ठीक.
कुंदन तिची  समजूत  काढायचा.आणि  एके दिवशी बाळाची चाहूल  लागली.कुंदनचे तर ऐकच सुरू  असायचे
  मला मुलगी  हवी.
खूपच  काळजी  घेतली रेवतीची त्याने.
बाळाचा जन्म  झाला.गोरी...गूबगूबीत.. कापसासारखी मऊ..मऊ    पिटूकली  मुलगी  कुंदनच्या हातात आली. कुंदन आणि रेवतीला स्वर्ग  दोन  बोट  उरला होता.तिचे हसणे,...बोलणे ..घर कसे प्रसन्न  वाटत होते.

साक्षी आता डाॕ झाली होती.रेवती आणि कुंदनला तिच्या लग्नाचा विचार  सुध्दा  असह्य  होत  होता. साधा ताप जरी आला तरी रात्र ...रात्र  जागरण  करणारे  आई..वडिल..नंतर  थोडीच मिळणार .?काळजी घेणारा  नवरा साक्षीला मिळेल का? देवा..माझ्या  साक्षीला तिच्यावर  खूप  प्रेम  करणारा ...तिला फुलांसारखे सांभाळून  घेणारा  नवरा मिळू दे या पलिकडे  आम्हाला  काहीही  नको.

कुंदन तर मुलाची एवढी कसून चौकशी  करायचा कि सर्वांना  हसायला येत होत.साक्षी आणि रेवती चूप  बसून  सर्व  बघायच्या.साक्षी तर हसून  कुंदनला चिडवायची
पप्पा तुम्ही  न , C I D..मध्येच पाहिजे  होते.किती  चौकशी  करता.

अरे बाळा काळजाचा तुकडा  परक्या  व्यक्तीच्या  हाती देणे  इतके  सोपे थोडीच  आहे.बाप आहे मी तुझा.
तुझ्या  सुखाचा...आंनदाचा विचार करायला नको का?

सरतेशेवटी राज सर्वांना  आवडला.लग्नाचा दिवस आला.लग्न  थाटामाटात पार पडले.निरोपाची वेळ आली.कुंदनरेवतीच्या ह्दयाची कालवाकालव वाढली.पोटचा गोळा  अनामिक व्यक्तीच्या  हाती  सुपूर्द करणे  किती  वेदनामयअसतेआईवडिलांकरिता.मुलीला  छान  सासर मिळाले  या आंनदा सोबतच ती आता परकी झाली याचे दुःख. आई..कुंदनचे तर एकच मागणे 
देवा,..तिला  आंनदाच्या श्रीमंतीत चिंब...चिंब भिजू दे.सुखी ठेव
हा निरोप खरेच  आईवडिलांसाठी  ...आंनदाचा तितकाच दुःखाचा.
साक्षीच्या  आयुष्याला नवीन  सुरूवात  होणार  होती...
ज्योती........

                      लघुकथा २

शर्वरी  नुकतीच  दहावी खूप चांगल्या मार्कांने पास झाली होती 
आणि आता मोठ्या शहरात चांगल्या काँलेज मध्ये अँडमिशन घेऊन डॉ होण्याचे स्वप्न बघत होती ....
 दहावीचे वय  म्हणजे तसे अल्लडच ..त्यामुळे ती नवीन शहरात कशी  काय  अँडजेस्ट याची चिंता  तिच्या आईवडिलांना पडली होती ....परंतु लेकीच्या भविष्यासाठी त्यांनी तिचे म्हणणे मान्य केले होते ....आणि चांगल्या काँलेज मध्ये तिची अँडमिशन घेतली होती.....

अखेर तिचा जाण्याचा दिवस उजाडला .....रात्रीचा प्रवास होता ...रात्री  निघून सकाळीच शहरात ..पोहोचणार होती ..
शर्वरी आणि तिचे बाबा ...गाडीत बसले आणि गाडी सुरु झाली ...
खिडकी जवळची जागा असल्याने पटकन  झोप पण लागली ...आणि थोड्या वेळाने खूप थंडीमुळे जाग आली ..स्वेटर घेण्यासाठी शर्वरी बाबांच्या जागेवर बसली आणि बाबा ..शर्वरीच्या ....

स्वेटर  घालून  शर्वरी आता आजूबाजूचे निरीक्षण करू लागली ....

शेजारच्याच सीट वर एक मुलगा होता ...तिच्या पेक्षा दोन तीन वर्षांनी  मोठा असेल ...खुपच हँडसम होता ...कदाचित मुस्लिम असावा ...वडिलांना अब्बाजान म्हणत होता ...एकदोनदा तिची अन् त्याची नजरानजर झाली ..अन् नंतर मग उगाच चाळाच लागला जसा त्याचा कडे बघायचा ...हे आपल्याला असे काय होते आहे ...काही कळतच नाही ..सारखे त्याच्याकडे का बघावेसे वाटते आपल्याला ... ?आणि ..आतून खूप छान पण वाटतंय कि ... त्या विचारात ..हातातली चावी पडली ...आणि दुसऱ्याच क्षणाला ...त्याने ती पटकन वाकून तिच्या हातात दिली ...क्षणाचीच ओळख पण तो स्पर्श तिला खूप सुखावून गेला ..

थोड्या वेळाने कुठलेसे स्टेशन आले ..आणि बाबा चहा प्यायला खाली उतरले ...येताना बाबांनी शर्वरी साठी  सुद्धा चहा घेऊन येत होते ..तोच गाडी ..सुरू झाली ...अन् शर्वरी घाबरली ..बाबांनी पटकन चहाचा कप  खिडकीतून  देण्याचा प्रयत्न केला ..पण तिला तो घेताच येईना ..तेवढ्यात तो उठला अन्.त्याने तो कप पटकन घेऊन तिला दिला ...शर्वरी मनोमन सुखावली ...अन् काही बोलणार तोच बाबा जागेवर येउन बसले ...
चहा तिच्या घशाखाली उतरेना ... 
आयुष्यात पहिल्यांदाच असे होत होते ...पण त्याला कसे घे  म्हणणार...!!! आपण असे कसे भावनिक होतो आहे  काही तासापूर्वीच  तर आपण भेटलो ...पण अशी कसे आपण त्याच्यात गुंतत जातो आहे ...अजुन तर आपल्याला त्याचे नावही माहिती नाही ...विचारावे का ....त्यालाही तसेच वाटत असेल का ...नाही तर पटकन ऊठून त्याने चहाचा कप का घेतला असता....?अशा असंख्य प्रश्नांची मालिका मनात सुरू असतानाच ..सकाळ झाली अन् ..तिचे उतरण्याचे ठिकाण आले ..बाबा सामान काढण्याची घाई करु लागले ...या ही वेळेस त्याने पटकन  ऊठून बाबांना सामान ऊतरवून देण्यास मदत केली ...आणि ...आणि ...तो निरोपाचा क्षण आला ....पुरती ओळखही नाही ...नावही माहीत नाही ...तरी  डोळे हे आसवांनी भरून आले होते ...बाबा रिक्षा थांबवायला वळाले आणि ......पटकन..त्याच क्षणी त्याने तिचे डोळे पुसले ...अन दुसऱ्याच क्षणात गाडीत चढून ..गाडी सूटली पण ....
म्हणजे हे फक्त एकतर्फी नव्हते तर ....
निरोपासाठी ..हलवलेला त्याचा हात बघतानाच ..परत एकदा तिचे डोळे आसवांनी भरून गेले 

एका रात्रीच्या प्रवासातली ..ओळख ती काय ? मन  गुंतत असतानाच ..निरोपाची ..वेळ येणे ..सगळेच न् समजण्यापलीकडचे ....
काही ...सुरू होण्यापूर्वीच ....निरोपाची वेळ येणे ....
ह्यालाच जीवन ..ऐसें नाव
   वैशाली......

                         लघुकथा  ३

 सहा महिन्यानंतर अर्जुन देशाच्या सीमेवरून सुट्टी घेऊन घरी आला होता.अर्जुन बालमित्र रामाला भेटण्यासाठी जातो. अर्जुन रामाच्या दुकानवर पोहोचतो आणि दुकानवर.....अर्जुन ची नजर श्रेयावर पडते...आणि बघतच रहातो...

 श्रेया: आईस्क्रीम वर एम.आर.पी. तर दहा रुपये आहे, मग तुम्ही माझ्याकडून बारा रू. कसे काय घेणार?... 

रामा: अरे ताई.. आईस्क्रीम ला फ्रीजमध्ये ठेवावे लागते. इलेक्ट्रिक बिल पण येते ना! म्हणून  बारा रु.
घेतो. तुम्हीपण थोडा विचार करा ना....

 श्रेया: ही काय गोष्ट झाली..
..इलेक्ट्रिक बिलचा मला काय करायचंय. एम.आर.पी.दहा रुपये मी तुम्हाला दहा रुपयेच देणार.
श्रेया अर्जुन कडे बघुन म्हणते..... 
मी एकही रु. जास्त देणार नाही....मी बरोबर बोलते आहे न!.
अर्जुन:..भानावर येवुन.. हो हो मँडम तुम्ही एकदम बरोबर आहे..... काय रे मॅडम कडून जास्त पैसे घेतोस... तू तर .....मॅडमला फुकटच द्यायला पाहीजे.
 श्रेया: नाही....नाही... हे दुकान माझ्या मामाचं नाही... फुकट घ्यायला. हे घ्या.. तुमचे पैसे आणि.. श्रेया  चालायला लागते....
अर्जुनही तिच्या सोबत चालायला लागतो.
 अर्जुन: हाय.
 श्रेया : हॅलो.
अर्जुनः नाव काय तुझे?.
 श्रेया : माझं नाव श्रेया. तुझं नाव काय?
अर्जुन: माझं नाव अर्जुन.
(श्रेया मनातच... माझी या मुलाची ओळखही नाही....पण का कुणास ठाऊक मला त्याच्याशी बोलताना संकोच नाही वाटत).
श्रेया: काय काम करतोस?.
 अर्जुन: । मी आर्मी मध्ये आहे.
श्रेया : अरे वा! तू सैनिक आहेस. किती छान!आय रिस्पेक्ट सोल्जर.. 'सैनिक देशाचे रक्षणकर्ते असतात'. 
दोघेही सोबत-सोबत चालु लागतात.
थोड्यावेळाने....
अर्जुन:  घराकडे हात दाखवुन.... हे माझे घर.
श्रेया: हो का..अरे वाss..इथे शेजारीच घराकडे हात दाखवुन...मी इथे रहाते.
अर्जुनः पण इथे तर कोळपे काकु रहातात ना?
श्रेया: हो मी त्यांची भाची...आत्या 
आजारी आहे म्हणुन मी मदतीला आले.
अर्जुन: ओ.. हss चल आपण शेजारी-शेजारी आहोत भेटुत...म्हणून अर्जुन स्वतःच्या घरी गेला आणि श्रेया शेजारी कोलपे काकुच्या घरी गेली.
अर्जुन ची आई ...कोलपे काकु मैत्रिणी... त्यात श्रेयाला आवडणारी आर्मी फिल्ड......अर्जुन ला श्रेया
पाहाताक्षणी आवडलेली. 
आताअर्जुन आणि श्रेया एकमेकांसोबत 
गप्पा मारू लागले...गप्पा मारत एकमेकांच्या 
आवडीनिवडींची जपवणुक होवु लागली.....
.......श्रेया  आणि अर्जुन चे ओळखीचे रूपांतर  प्रेमात कधी झाले दोघांनाही कळलेच नाही.
 अर्जुन आणि श्रेया  दोघेही रोज भेटायला लागले.
एक दिवस...
अर्जुन:ऐक ना...श्रेया... उद्या लॉंग ड्राईव्ह ला येशील ?
एक surprise आहे तुझ्यासाठी...
श्रेया: हो...येईल ना.
अर्जुन: मी वाट पाहीन.
 श्रेया : नक्की.
 दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन गाडी घेऊन श्रेयाच्या घरासमोर येतो. 
श्रेया ला फोन करतो. 
श्रेया:हॅलो..
अर्जुन: श्रेया मी तुझी बाहेर वाट बघतोय.
श्रेया : आलेच.
अर्जुन आणि श्रेया  गाडीत बसून दोघेही  लॉंग ड्राईव्ह साठी  निघतात. 
काही वेळानंतर  दोघेही एक रम्य स्थळी पोहोचतात. 
अर्जुन श्रेयाचा हात हातात घेऊन दोघेही  चालायला लागतात. 
चालता चालता .....
श्रेया: तुला  लहानपणापासूनच आर्मी मध्ये जायचे होते का?
 अर्जुन:हो..  माहिती आहे.... मी लहान असतांना तर.... भारतीय प्रतिज्ञा... जेव्हा ऐकायचो... तेव्हा लोक तर.. फक्त उभे राहतात. पण माझ्या अंगावर काटे (रोंगटे) उभे राहत होते. हळूहळू  तो जोश ,जुनून वाढतच गेला. आणि मी आर्मी जॉईन केली. देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली.
 चालत चालत दोघं एका बाकावर पाय सोडून बसतात. 
श्रेयाचे पहिले प्रेम असते. हळूच श्रेया अर्जुन कडे बघते... दोघांची नजरा-नजर होते....लागलीच श्रेयाच्या पापण्या लाजेने  खाली झुकतात.
 अर्जुन श्रेयाचा हात हातात घेऊन प्रेमाने श्रेयाच्या डोळ्यात बघून हळूच विचारतो;  
श्रेया  माझ्यासोबत लग्न करशील?.
 श्रेया: लाजून.... श्रेयाच्या डोळ्यांच्या पापण्या लाजेने हलकेच खाली झुकतात ....आणि स्मित हास्य करीत... 'हो करेन' 
आणि अर्जुन चा हात सोडुन.... लाजून पाठ फिरवते. तितक्यात....
  अर्जुन ला फोन येतो ..अर्जून फोनवर येस सर ..येस सर. एवढेच बोलत असतो. शेवटी ओके सर बोलतो.. आणि फोन बंद करतो. 
श्रेया : काय झाले ? 
अर्जुन: माफ कर श्रेया ...  

'देशाच्या सीमेवरील स्थिती गंभीर आहे'.
 मला लागलीच जायला हवे.
श्रेया : एवढ्या लवकर जायला हवे... आत्ताशी तर....इतक्या सुंदर स्वप्नामध्ये रंगायला सुरुवात झाली होती .... की लगेच स्वप्नांची श्रृंखला तुटली.... डोळ्यात पाणी तरळते तिच्या .... आणि श्रेया ला स्मरण  होते की, मी एक सैनिकाची होणारी   पत्नी आहे. आणि...लगेचच.. श्रेया...अर्जुनला....
तुला निघायला हवे... जा.. तयारी कर..
अर्जुन: श्रेया  लवकरच येईल मी..... ....असे म्हणून अर्जुन श्रेयाला भावविभोर होऊन निरोप देतो....
स्मिता...

                      लघुकथा  ४

सकाळपासून  श्लोकाची घरात  गडबड सुरु होती.
दहावीची परीक्षा जवळ आलेली.
पण आज अभ्यासाला सुट्टी दिली तिने.
खास दहावीसाठी शाळेने  निरोपसमारंभ आयोजित केला होता. नेहमी मुलांकडून फीच्या रुपात पैसे घेणारी शाळा आज मुलांना जेवण देणार होती. म्हणून सगळी मुले खूष.
श्लोका छानशी साडी नेसून,हलका मेकअप करुन मुक्ताची
वाट बघू लागली.मुक्ता आली आणि दोघी शाळेत गेल्या.आज सगळ्या मुलींनी साड्या नेसायच्या आणि मुलांनी कुर्ता-पायजामा घालायचा असे ठरले होते.
हळूहळू सगळे शाळेत पोहचले. 
आता यापूढे असे सगळे आपण कधी भेटणार या विचाराने सगळे दुःखी होते.
सुरवंटाचे फुलपाखरु बनायचे हे वय. वयानुसार काहीजण प्रेमात पडलेली. श्लोकालाही  जय  आवडायला लागला होता.
आता शाळेचे दिवस संपल्यावर सगळ्यांना एकमेकांचा विरह होणार होता.  पहिली पासून दहावीपर्यंत एकाच शाळेत.किती अनंत आठवणी असणार सगळ्यांजवळ.

जेवणे झाल्यावर निरोप देणे सुरु झाले.श्लोका शाळेच्या आठवणी आठवून रडायला लागली.
तेवढ्यात जय येऊन तिला समजवायला लागला,

ए वेडाबाई रडतेस काय? आपण कायमचे थोडी वेगळे होणार? भेटत जाऊ कि एकमेकांना. 
आणि आता आपण शाळेला निरोप नाही दिला तर शाळेने दिलेल्या पंखात बळ कसे भरु? आता आपल्या वाटा वेगवेगळ्या,ध्येय वेगवेगळी. लहानपणापासून सगळ्यांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्याचे दिवस तर आता आले.
ए मुक्ता समजव ग तुझ्या मैत्रिणीला. 
असे म्हणून जय हसू लागला. सगळ्यांना पटले त्याचे म्हणणे.
शाळा सुटल्यावर सगळ्यांच्या आयुष्याची नवीन सुरूवात होणार होती. स्वप्नांना पंख फुटणार होते.

असा असावा निरोपसमारंभ
तिथून व्हावा नव्या जीवनाचा आरंभ
अशा ओळी गुणगुणतच श्लोका घरी आली.
प्रिती......

                     लघुकथा ५

वसु ...ए.... वसु ..उठ ..उठ .जेवायला वाढ....उठते की नाही.
नामदेव तोल जाऊन खाली पडतो ..,हातातली पिशवी वसुच्याअंगावर  भिरकावतो ...तरी वसु ची हालचाल न पाहता  ...तिला शिव्या द्यायला  लागतो ..
साली जास्त शहाणी झाली त्या मालकिनीच्या जीवा वर  ....चार मोठ्या लोकांकडे काम काय करते, नवरा उपरा वाटतो आहे तुला.चल उठ ...
दारु पिलेला नामदेव तोल सांभाळत बिछाण्या वर आदळतो...जोराने  ओरडतो ...
उठ ....जास्त  हुशार झाली न मग हो तुझ्या माहेरी ..उद्या च निरोप देतो तुझ्या  लाडक्या भावाला..मोठ्ठा ताई-ताई करतोनं,घेऊन जा  तुझ्या बहिणीला .... काही वागत नाही हीचं ....दोन दिवस गेले की बिमार ...झाड आहे का पैशा चं, काहि सुख नाही हीच मलां.पाठवतोच निरोप ... 

नामदेव नशेत बडबड करत ,वसु ची चौकशी न करता  झोपी  जातो.
अनभिज्ञ नामदेव ,दुर्दैवाने तोच उपरा झालेला. त्याला काय माहिती  ,वसु ...वसु नी त्या अठरा विश्वे दारिद्रय  असलेल्या  त्याच्या संसाराचा ,त्याच्या पाशवी वृत्ती  चा,त्याच्या व्यसना चा,त्याच्या माणसांचा ..त्याच्या गावाचा ,घराचा ,या जगाचा या मानवी  देहा चा कधीच निरोप घेतला होता ....मुक्ती मिळवली होती बिचारी ने, या त्रासदायक आयुष्यातून..याअसह्य यातनेतून सुटका झाली होती तिची ....निरोप घेतला होता या ऐहिक जगाचा, जिथे तिला सुखा ची परिभाषा ही कळली नव्हती.असा निरोप जो घेऊन ती वैकुंठी च्या प्रवासा ला निघाली होती. तिचा नवा आरंभ होणार होता..
            निरोप एक शाश्वत सत्य ...
समयस्त नसे ...आरंभ असे नाविन्याचां.
"इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणा ने केली सुटका जगण्या ने छळले होते"...
सरिता.....


वाचक मंडळी ,
आवडल्या का आमच्या कथा?
तुमचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अपेक्षित आहे

Comments

  1. सर्वच कथा वाचून मन हळवे होते.
    ज्योती ताई, वैशाली, मी स्मिता, प्रिती, सरीता ताई
    खुप सुंदर लिहिले आहे ऐकूनच सर्वांनी.
    👌👌🙏🏻🙏🏻💯💯

    ReplyDelete
  2. वाह छान उपक्रम
    विषय एक ...आशय अनेक

    ReplyDelete
  3. वाह छान उपक्रम
    विषय एक ...आशय अनेक

    ReplyDelete
  4. सर्व गोष्टी सुंदर.

    नितिन.

    ReplyDelete
  5. सर्व लघूकथा उत्तम आहेत. अगदी नेमक्या शब्दात मांडलेली शर्वरी ची गोष्ट, छान साधली आहे.
    एकूणच उत्तम प्रयत्न. पूढील विषयाची वाट पाहू

    ReplyDelete
  6. एकाच विषयावर सर्वांनी व्यक्त केलेले विचार अतिशय सुंदर
    स्तुत्य उपक्रम

    ReplyDelete
  7. Shruti dani... खूप छान विषय..
    सगळ्याच कथा उत्तम.. Vaishali च्या
    कथेतला निरोप विशेष आवडला..

    ReplyDelete
  8. All the short stories are well written

    ReplyDelete
  9. सिंधू सोनवणेOctober 10, 2020 at 1:28 PM

    सगळ्या कथा खुपच सुंदर आहेत.

    ReplyDelete
  10. महेमूद नदाफ ( योगशिक्षक,अहमदनगर)
    मो- 9420786186
    सर्वच लघुकथा खुप छान आहेत.
    ' निरोप ' या एकच विषयाचा मानवी जीवनातील वेगवगळ्या टप्प्यांवर कश्या प्रतिक्रिया निर्माण होतात याचे समर्पक वर्णन केले आहे.
    स्थल ,काल आणि प्रसंगानुरूप विविध भावनांचा संबंध अगदी तंतोतंतपणे जुळवीला आहे.
    ज्योती,प्रिती,स्मिता,सरिता आणि वैशाली तुम्ही पाचजणी म्हणजे जणु एखाद्या बहारदार मकरंदपुष्पाच्या उमलत्या पाकळ्या आहात व भावनांचा मकरंदरस विविध विषयांच्या लघुकथांच्या माध्यमातून आमची वाचनतृष्णा शमवीत असता.
    धन्यवाद..

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ,सर

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

पूर्वसंकेत---एक गूढ

आरसा मनाचा

नाजूका भाग-२

शब्दपर्ण

अधीर मन झाले....... (लेखिका मोहिनी पाटनुरकर ---राजे)