नाजूका भाग-२

(नाजूका भाग १ चि लिंक
http://gajbhiyepreeti72.blogspot.com/2020/09/blog-post_15.html)



मास्तर बदली करुन दुसऱ्या गावाला गेले. त्यांच्या गावाजवळून हे गाव जवळ होते.रोज येणेजाणे करु शकत होते. बायको,मुले,आईवडील  यांच्यासोबत ते राहू शकत होते.

मास्तरचा प्रपंच वाढला होता.गावात शेती होती.आईवडील लक्ष द्यायचे शेतीकडे. मास्तरला कधी कधी नाजूका आठवायची. 
मी भीतीपोटी इकडे निघून आलो.नाजूकाचे काय झाले असेल? अजाण,अवखळ पोर तिचे आयुष्य नासवले मी. तिची किती बदनामी झाली असेल समाजात.

मास्तरच्या डोक्यात असे विचार आले कि चक्रावून जायचे. स्वतःला दोष देत बसायचे.
पण मी काय करु शकलो असतो.दुसरा उपायच नव्हता. 
असे म्हणून स्वतःचा बचाव करायचे. 
आयुष्य चालले होते.म्हातारपणामुळे वडील गेले.आता शेतीत मास्तरांना लक्ष घालवावे लागत होते.
पाच वर्षांनी मास्तरांची परत दुसरीकडे  बदली झाली.
हे गाव जरा लांब असल्यामुळे येणे जाणे करणे शक्य नव्हते.तिथे मास्तरने एक खोली भाड्याने घेतली.आठवड्यातून एकदा गावी येत होते. जीवन स्थिर होते. संथपणे चालले होते.

नेहमीप्रमाणे मास्तर शनिवारची शाळा करुन आले आणि सोमवारी पहाटेच शाळेच्या गावी परतले.आता त्यांनाही दुसऱ्या गावाला करमत नव्हते.मुले मोठी होत होती.मुलांची,बायकोची आठवण यायची. पण गावी शेती असल्यामुळे सगळ्यांना सोबत नेऊ शकत नव्हते. मास्तर सोमवारी परतले आणि त्याच रात्री  गावी भूकंप झाला. संपूर्ण गाव बेचिराख झाला. मास्तरला टीव्हीवरुन बातमी समजली. क्षणभर त्यांना काय झाले याचा अंदाज आला नाही. मास्तर भोवळ येऊन खाली कोसळले.

नाजूकाला दिवस गेल्याचे फार दिवस लपून राहू शकले नाही.मुल नको म्हणून नाजूकाची आई नाजूकाला घेऊन दवाखान्यात गेली पण डाॕक्टरने आता उशीर झाला म्हणून परत पाठविले .
आता मुल नको असले तरी त्याला जन्म  द्यावा लागणारच होता. नाजूकाचे गावात राहणे आता अशक्य होते. आईने एका खेड्यात तिचे तिला लांबचे नातेवाईक होते तिथे पाठविले.
नऊ महिने संपले आणि नाजूकाने तिच्यासारखीच गोड मुलीला जन्म दिला.नाजूकाने नक्षत्रा  नाव ठेवले तिचे. नक्षत्रा नक्षत्रासारखीच सुंदर होती. दिवसागणिक नक्षत्रा मोठी होत होती. नाजूका मोलमजूरी करुन नक्षत्राचे पालनपोषण करत होती.
मास्तरमुळे आपल्या आयुष्यातची परवड झाली हे नाजूका विसरु शकत नव्हती.

नक्षत्रा सहा वर्षाची झाली.नाजूकाने तिचे  नाव गावच्या शाळेत टाकले.आता नक्षत्रा चवथीत गेली.
तिच्या शाळेच्या जुन्या मास्तरांची बदली झाली आणि नवीन मास्तर आले.

मास्तर शाळेत आले.त्यांच्याकडे शिकवायला चवथीचा वर्ग दिला.मास्तर वर्गात  आले आले आणि ओळख होण्यासाठी सगळ्यांची नावे विचारली.नाव विचारत विचारत नक्षत्राचा नंबर आला.तिला बघताक्षणी मास्तरांना हादरा बसला. नाजूकासारखीच हुबेहुब. मास्तरांनी कसेबसे नाव विचारले.
नक्षत्रा
नक्षत्राने उत्तर दिले.
शाळा सुटली.नक्षत्रा घरी आली.मास्तर शाळेतच बसून विचार करत राहिले.

कोण असेल ही नक्षत्रा?
नाजूकाची मुलगी?
तिचे लग्न झाले असेल?
नक्षत्रा चवथीत म्हणजे नऊ वर्षांची तरी असेल.
नक्षत्रा माझी मुलगी?

मास्तरांना घाम फुटला पण हायसेही वाटले.
त्यांना त्या भूकंपानंतर आपले म्हणावे असे कुणीही नव्हते. आता नक्षत्रा त्यांचीच मुलगी आहे याची खात्री  पटल्यानंतर  त्यांच्या मनाला जणू आशेचे धुमारे फुटले.
दुसऱ्या दिवशी नक्षत्रा शाळेत आली.मास्तरनी तिला घर कुठे आहे? घरात अजून कोण असते? विचारले.
आम्ही दोघीच असतो घरात 
हे नक्षत्राचे उत्तर ऐकल्यावर नाजूकाने लग्न केले नाही हे लक्षात आले त्यांच्या.

आता मी माझी  चूक दुरुस्त करु शकतो.नाजूकाला माझ्यामुळे जो त्रास झाला  त्याची भारपाई करेन मी.तिला सुखात ठेवेन.

असा  विचार करत राहायचे मास्तर.
एकेदिवशी नक्षत्राला जवळ बोलवून त्यांनी आईला शाळेत भेटायला बोलविले असा निरोप द्यायला सांगितला.
नक्षत्राने नाजूकाला निरोप दिला.नाजूका दुसऱ्या दिवशी मास्तरांना भेटायला नक्षत्रासोबतच शाळेत आली. ती बाहेरच एका झाडाखाली मास्तरांची वाट बघत थांबली.
नक्षत्राने आई भेटायला आली
असा मास्तरांना निरोप दिला.मास्तरांनी मुलांना काही काम दिले आणि  नाजूकाला भेटायला आले.
मास्तरांना बघून नाजूकाच्या आनंद,दुःख कुठल्याही भावना जागल्या नाहीत.ती पुतळ्यासारखी स्थिर राहून एकटक विस्फारीत नजरेने मास्तरांकडे बघू लागली. मास्तरांना बोलण्याची सुरुवात कशी करावी समजत नव्हते.
'नाजूका मला क्षमा कर' 
मास्तर खोल गेलेल्या आवाजात बोलले.तरीही नाजूका शांतच होती.
' नाजूका मी चुकलो.मला क्षमा कर'
मास्तर परत बोलले.
नाजूका काहीही न बोलता चालू लागली.

नाजूका अग माझे ऐकून तरी घे.

 मास्तरांनी तिचा रस्ता अडवून तिला थांबविले. नाजूकाला थांबावेच लागले.
मास्तरांनी इथून गेल्यानंतरचे आयुष्य तिला सांगितले.
नाजूकाला सर्व ऐकून दुःख झाले.

'पण आता मी काय करु शकते?' 
तिने मास्तरांना विचारले.
नाजूका आपण तिघांचे वेगळे जग बनवू.तू मी आणि नक्षत्रा.नाजूका नक्षत्रा माझी मुलगी आहे.मला पहिल्याच दिवशी लक्षात आले.

नाजूका म्हणाली, 
नाही मास्तर ती माझी आहे.एकटीची.तुम्ही तर तिची चाहूल लागल्याबरोबर भ्याडपणे पळून गेलात.

नाजूका माझे लग्न झाले होते.

ते तुम्ही लपवून ठेवले होते. 

मी तेव्हा चुकलो होतो. मला क्षमा कर नाजूका.

तू माझ्यावर प्रेम करतेस.म्हणूनच तू लग्न नाही केले

हो मास्तर तुम्ही बरोबर ओळखले.मी तुमच्यावर प्रेम करते.आयुष्यभर करेल.पण तुम्ही केलेल्या फसवणूकीच्या दुःखाने डागाळले हे प्रेम. मी क्षमा नाही करु शकत तुम्हाला. मला,माझ्या  घरच्यांना तुमच्यामुळे जगणे अवघड झाले.मला गाव सोडून इथे यावे लागले.माझ्या मुलीला बापाचे नाव नाही.
मी का क्षमा करावी तुम्हाला?
बरं मी करते तुम्हाला क्षमा.तुम्ही माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या.

मास्तर आनंदले. 
विचार नाजूका.कुठलाही प्रश्न विचार.
नाजूकाने विचारले,
' तुमच्या गावात  भूकंप नसता आला तरी तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार  झाले असते? नक्षत्राला बापाचे नाव दिले असते?

मास्तर अवाक् होऊन नाजूकाकडे बघत राहिले.
मास्तरकडे या प्रश्नाचे ऊत्तर नव्हते.
शाळा सुटली. नक्षत्राला घेऊन नाजूका झपझप निघून गेली.काही वर्षापूर्वी  मास्तर नाजूकाला आसेच एकटे टाकून निघून गेले होते.....

'नाजूका'   आवडली का? आवडल्यास blog ला follow करा.
आमचे फेसबुक पेज लाईक करा.
जीवनगाणे सप्तसुरांचे...

Comments

  1. दोन्ही भाग खूप छान, मानी आहे नाजुका
    ........मोहिनी

    ReplyDelete
  2. व्वा ..खूप छान .
    जशास तसे ...अगदी योग्य निर्णय घेतला नाजूका ने....
    मस्तच ग विशाखा ...
    वैशाली जोशी ..खोडवे ..

    ReplyDelete
  3. संधीसाधू स्वार्थी मास्तराला निसर्गाने बरोबर अद्दल घडवली बरं झालं नाजुका जशास तशी वागली

    ReplyDelete
  4. शेवट खूप आवडला,प्रत्येकाने आपला स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे, स्री किती करारी,स्वाभिमानी असते हे सिद्ध होते शेवटी,मस्त
    माधुरी

    ReplyDelete
  5. नाजूका ने घेतलेला निर्णय योग्य आहे.

    ReplyDelete
  6. छानच लिहिले ...नाजूका छान साकारली,....jyoti

    ReplyDelete
  7. रसिक वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

शब्दपर्ण

समर्पण-९

महिलादिन विशेष