पूर्वसंकेत---एक गूढ


फोन : मालती राणे, तुम्हीच का ? मकरंद राणे कोण तुमचे ?

 मालतीहो,  मुलगा,  का?  काय झालं ? 

 फोनलास्ट डायल तुमचा होता म्हणून फोन केला. त्यांना सिवियर हार्ट अटॅक आलाय. आम्ही ऑफिसमधून तडक हॉस्पिटलमध्ये नेतोय.  पण....... बहुतेक

फोन कट झाला. 
मालती : हॅलो .....हॅलो...... बहुतेक कायssss ?

मालती ताडकन झोपेतून उठून बसली. 
'बापरे!  किती भयंकर स्वप्न'. 
तिला झोपेत सुद्धा दरदरून घाम आला होता. आठ दिवसात हेच स्वप्न तिला दोनदा पडले होते.  पहिल्या वेळेस तिने इतका विचार केला नव्हता.  पण आता तिने लगेच नवऱ्याला, मधुकरला सांगितले आणि लगोलग मकरंदची खुशाली  फोनवर  विचारली.  सगळं ठीक होतं.  तब्येत चांगली होती. कसलाही त्रास नव्हता.
 मालतीला जरा हायसं वाटलं.

मधुकर : मालती,  ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम असते,  काळजी असते , त्यांच्याचबद्दल आपल्या डोक्यात असे विचार येतात . काळजी नको करू त्याची. 
उद्या शनिवार आहे वाटल्यास जाऊन भेटून ये.
तुझी नात पण आठवण काढते तिकडे.  तुलाही बरे वाटेल. मला मात्र यायचा आग्रह करू नको. 
तिकडे करमत नाही ग मला.

मधुकर मालती राहतात कल्याणला आणि मकरंदने फ्लॅट घेतला होता मीरा रोडला.  त्या दोघांनाही तिकडून ऑफिस जवळ आहे. 
 तसे मुंबईत आई वडील मुलगा वेगवेगळे राहणे म्हणजे काही विशेष नाही.
 शुक्रवारी मालतीने घरातलं सगळं आवरलं. मधुकरचा दोन्ही वेळचा स्वयंपाक करून ठेवला. 
 मधुकरचा निरोप घेतला.
 संध्याकाळच्या लोकलनी ती मकरंद कडे निघाली. डोक्यात मकरंदचाच विचार.

मकरंद दिसायला हुबेहूब  मधुकरसारखा. उंची, रंग, बांधा. दोघांचा आवाज आणि बोलण्याची पद्धतही सारखीच. आवाज तर इतका सारखा की, फोनवर बरेचदा चक्रावेल कोणी. शिवाय आवडी-निवडी पण सारख्या .

नोकरीमुळे मालतीने दुसऱ्या अपत्याचा विचार केला नव्हता. 
 तिला गाडीचा वेग आज  जरा कमी वाटत होता.
 एकदा मकरंदला बघितल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती.
पोचल्याबरोबर तिने मधुकरला फोनवर तसं कळवलं. शनिवार-रविवार दोघांनाही सुट्टी. दोन दिवस मजेत गेले सगळ्यांचे. 
 रविवारी संध्याकाळी तिला वापस निघायचं होतं. लोकलमध्ये बसल्यावर मालतीने पुन्हा एकदा नवऱ्याला निघाल्याचे कळवले.  
"काहीही पार्सल आणून ठेवू नका,  मी दोघांचा डबा घेऊन येतेय. तुमच्या सुनेने करून दिले तुमच्या आवडीचं". 

मालती आठच्या दरम्यान कल्याणला घरी पोहोचली. दाराला कुलूप. 
"पाय मोकळे करायला गेले असतील"
 तिने latch key ने दार उघडले.  
मधुकर आराम खुर्चीत मागे मान टेकून..... झोपलेले?? उजवा हात छातीवर, चष्मा डोळ्यांवर तसाच.
 वर्तमान पेपर खाली पडलेला.  मालतीने मधुकरला हलवून उठवले, तसा त्यांचा उजवा हात निसटून खाली लोंबकळला.  तिला हाताचा थंडगार स्पर्श जाणवला.

फोन : मकरंद  राणे तुम्हीच का ? 
मधुकर राणे कोण तुमचे ?  
मकरंद : हो, वडील,  का ? काय झालं ? 
फोन :  त्यांना सिवियर हार्ट अटॅक आलाय.  मी हॉस्पिटल मधून बोलतोय. पण बहुतेक......

फोन कट झाला.
 मकरंद : हॅलो.... हॅलो ..बहुतेक काय sssss ? 

मालतीला शुद्ध नव्हती कसलीच. सुन्न बसुन राहीली.

आत्ता तिला स्वप्नातला उलगडा झाला होता.  स्वप्नात झालेला भास हा मधुकरसाठी होता.  संकट मधुकर वर येणार होतं. स्वप्नात दिसलेला मकरंद नाहीतर मधुकर होता.
जाताना मधुकरचा निरोप घेऊन निघालेली मालती, वापस आली तेव्हा मधुकरनेचं तिचा
 'अखेरचा निरोप'
घेतला होता .
लेखिका-- मोहिनी पाटणूरकर (राजे)

एक नोव्हेंबरपासून Blog वर,मनातील मोरपीस ही कथामालिका येत आहे.
दहा दिवस दहा कथा.
तुमचा प्रतिसाद,अभिप्राय अपेक्षित आहे.

आमच्या कथा आवडत असतील तर पेज(जीवनगाणे सप्तसुरांचे)  आणि blog like,follow करायला विसरु नका.

विधिलिखित भाग ७ ची लिंक

http://gajbhiyepreeti72.blogspot.com/2020/10/blog-post_23.html

Comments

  1. Replies
    1. नवोदित लेखिका,सौ.मोहिनी शैलेश पाटणुरकर,सर्व प्रथम तुमचे धन्यवाद,आपण जिवनाच्या कठोर/ कटु प्रसंगावर अत्यंत सुलभतेने लिखाण केलेले असुन वाचतांना संपुर्ण प्रसंग डोळ्या समोर दिसत होता.लेखकाचे खरे कौशल्य यातच आहे.जिवंत प्रसंग शब्दरुपी साकारता आला पाहिजे.
      म्हणतात ना...मन चिंती ते वैरी न चिंती....तसे निसर्गाने स्वप्न रूपाने पुर्व संकेत दिला होता.परंतु वेळेवर त्याने पाञ बदलले.....हिच अत्यंत धक्कादायक बाब आहे...
      अशी वेळ कोणावरही येउ नये असे सर्वांनाच वाटते.परंतु आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्या शिवाय माणसाच्या हाती दुसरा पर्यायही ठेवलेला नाही.
      तुमचे सहज,सुलभ लिखाण छानच आहे.असेच नवनविन विषयांवर लिखाण सुरू ठेवावे.भावी लेखास खुप खुप शुभेच्छा.

      महेश श्रीनाथ बोर्डे,
      टिळकनगर,नांदेड

      Delete
  2. खूप छान लिहिलंय मोहिनी
    👏👏👏👏👏👏👏
    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  3. खूप मस्त मोहीनी...
    वेगळाच विषय होता ..छान लिहीलेस

    वैशाली ..जोशी ..खोडवे

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks vaishali, काही पटले किंवा आवडले नसेल तर feed back पण देत जा.

      Delete
  4. विधिसंकेत कित्येकदा काळात नाहीत
    आणि काळे पर्येंत उशीर झालेला असतो त्याचे उत्तम उदाहरण
    छान लिहले आहे मोहिनी

    ReplyDelete
    Replies
    1. विधिलिखित आणि विधिसंकेत, एकमेकांशी जोडलेले असतात.
      Thanks preeti

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

आरसा मनाचा

शब्दपर्ण