शब्दपर्ण

 टीममध्ये आपले स्वागत आहे.
एका छोट्या ब्लाॕगपासून सुरु झालेला प्रवास केवळ तुम्हा वाचकांच्या प्रतिसादामुळे 'शब्दपर्ण' वेबसाईटपर्यंत पोहचला.

लोग मिलते गये,कारवाँ बढता गया....

प्रमाणे आधी एकटीने सुरु केलेल्या लिखाणाच्या प्रवासात मित्रमैत्रिणी सहभागी होत गेले.  
वाचक  बनलेले नंतर ह्याच वेबसाईटवर लेखकही बनले.
दर्जेदार लिखाण घरोघरी पोहचवण्याचा 'शब्दपर्ण' टीमचा प्रयत्न असणार.

लिहिते व्हा....
शब्दाचे दान सगळ्यांच्याच पदरी पडत नाही.
ज्यांना ते मिळाले त्यांनी लेखन करायलाच हवे.
आपण लिहिले तरच आपल्या लिखाणात ताकद आहे,जादू आहे हे उमजते.

आमच्या ह्या प्रवासात  आम्हाला अशाच' लिहिते व्हा' म्हणणाऱ्या आमच्या सारख्या वाटसरुंची गरज आहे.

अट एकच..लिखाण दर्जेदार असावे.


खरे म्हणजे शब्दाचे मोल करता येत नाही. पण फुल ना फुलाची पाकळी....
लिखाणाला views नुसार मानधन देण्यात येईल.

(मानधन आपली साईट monetize झाल्यानंतर देण्यात येईल.पण views तुमच्या  पहिल्या लिखाणापासूनच count होतील.)



इथे लिखाण मुक्त असेल,लेखणीला बंधने नाहीत.
फक्त कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याचे भान ठेवावे लागेल.
आपण कथा,लेख, कविता , व-हाडी लिखाण,समीक्षणे,विशेषांक....यापैकी जे लिहायला आनंद मिळेल ते लिहायचे.

विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतील आणि आकर्षक बक्षिस पण मिळणार. त्यामुळे चालते व्हा, इथे....

'विचाराना प्रश्न' या सदराखाली चर्चा होणार पण चर्चा व्हावी-वाद नको.



आपल्या 'शब्दपर्ण' मध्ये  स्वयंप्रकाशनाची व्यवस्था आहे.( self publishing) यात तुम्ही स्वतःची पुस्तके प्रकाशित करु शकणार. त्यांची विक्री करु शकणार.

शब्दपर्णशी जोडून शब्दपर्ण नावाचे एक you tube channel आहे. सादरीकरणाची कला असणारे त्याचा वापर करु शकतील.

याशिवाय 'शब्दपर्ण' अजून वाचनीय आणि दर्जेदार होण्याकरिता तुम्ही दिलेल्या सुचनांचे स्वागत आहे.



शब्दपर्ण टीम

 वेबसाईट सुरु झाली कि वाचकांना कळवण्यात येईल.
मराठी,हिंदी आणि English अशा तिनही भाषांमध्ये वेबसाईट असणार.

Comments

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

समर्पण-९

महिलादिन विशेष