जीवनगाणे-सप्तसुरांचे
मी प्रीती/विशाखा.
जीवनगाणे सप्तसुरांचे
जीवन गाण्यासारखे सुरात गुंफलेले
दुःखाचे गाणे, आनंदाचे गाणे,प्रेमाचे गाणे,रागाचे गाणे,.....
सात सुरांसारखे.
रागदारीच्या सरगम सारखे जीवनातही कधी कोमल स्वरांसारखे मागे जावे लागते तर कधी तीव्र स्वरासारखे पुढे .
कधी वादी स्वरासारखे सांभाळून घ्यावे लागते तर कधी संवादी स्वर गवसतात. काही स्वर तर चक्क वर्जित करावे लागतात.
आपण कोणते सूर निवडतो आणि त्या सूरांसारखे स्वतःला ला किती बदलतो यावर आपल्या जीवनगाण्याचे रुप अवलंबून असते.
जीवनाकडे गाणे समजून बघितले तर चराचरात गाणे दिसेल आपल्याला.
वाहणाऱ्या नदीची झुळझुळ, समुद्राच्या लाटांची गाज, कोसळणाऱ्या पावसाची टपटप, वाऱ्याने हलणाऱ्या पानांची सळसळ, पहाट झाली हे सांगणारी पक्ष्यांची किलबिल चिमणीची चिवचिव, कोकिळेची कुहूकुहू,
भूंग्याची गुणगुण....सगळीकडे गाणी.
जन्माला आल्यावर आईने अंगाईगीत गाऊन झोपवलेल्या बाळा सोबत गाणे कायम राहते.
काही गाणीवेडे अक्षरशः गाणी जगतात.
जीवनातले सूर हरवले तरी जगण्याचा ठेका,नाद कायम असतो त्यांचा. जीवनसुरांची खरी जाण त्यांनाच असते.
जीवनगाणे गातची राहावे ही ओळ उमजली असते त्यांना.
रसिक वाचक,
तुमच्याशिवाय हे सप्तसुरांचे जीवनगाणे बहरणार नाही.
ही जीवनगाणी
तुम्ही वाचा.
आणि काही चुकले तर सांगा.
सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला
ह्दये हलता वरखाली
ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकार यावे
जीवनगाणे गातची रहावे.( शांता शेळके )
Wow ati sundar
ReplyDeleteSmita Aurangabadkar
Deleteजीवन गाणे गातच रहावे 👍
ReplyDeleteमस्तच .. शिरीष
ReplyDeleteखरं आहे जिवन हे गाणे आहे तुमचे सूर कसे लागतात किंबहुना तुम्ही जसे सूर लावतात आणि त्या साठी तुम्हाला सोबत ( corus) कशी मिळते यावर तुमचे जीवन कसे जाईल ते ठरते पण गाण्यात जसे वरचे आणि खालचे सुर असतात तसेच ते जीवनात पण असतात तुम्ही ते कसे पेलून घेतात त्यावर सर्व काही ठरतं
ReplyDeleteसुंदर विचार
सुर .... गाणे....सप्तसुर .... हेच मानवी जिवनाचा आत्मा आहे तुमच्या आयुष्यात सप्तसुर ,संगीत आहे तरच तुमच आयुष्य तरल व उत्साहवर्धक आहे
ReplyDeleteमाझ्या आयुष्यात संगींत रुपी सौ. आहेतच बाकी आपन .... कानसेन ☺️☺️
विशाखा छान लिहलस, शब्दांकन मांडनी उत्कृष्ट ..…असेच वेगवेगळ्या विषयावर लिखान सुरू ठेव ✔️👍👍
सुरेंन्द्र बनसोडे
छान लिहिलस, जगातला पहिला स्वर म्हणजे परमेश्वराचा 'हुंकार' म्हणतात. अस व पु काळे म्हणतात
ReplyDelete