आरसा मनाचा

आताशा आरशात बघतांना धास्तावतो जीव तिचा
चेहऱ्यावर एखादी सुरकुती बघून वाढायला लागतात काळजाचे ठोके,
एखादा पांढरा झालेला केस लपवावा  म्हणून 
धडपडते मन,
भुवईत एखादा जास्तीचा केस बघून ब्युटिशियनची appointment  घ्यायला हवी,
चंदेरी केसाला काळा रंग द्यायला हवा
 याची होते तिला आठवण
यौवन संपून
म्हातारपण येत आहे  या जाणीवेने अस्वस्थ,उदास  झालेली ती
जरा वेळ  पापण्या मिटून  पडण्याचा करते प्रयत्न 
पडतो तिच्या  मनात  लख्ख  उजेड.
तिच्या वेगवेगळ्या  प्रतिमा दिसायला लागतात तिला
अरे, हा मनाचा आरसा विसरलीच होती कि.
त्यातच तर तिचे खरे प्रतिबिंब उमटते.
तिला त्या आरशात दिसायला लागते 
अजूनही यौवनात असलेली ती, 
टवटवीत, तारुण्याच्या तरल भावना   जगत असलेली,
प्राजक्ताचा सडा बघून तशीच आनंदित होणारी. 
मोगरा,चाफ्याच्या गंधाने धुंद होणारी,
घराच्या मागच्या बागेत बागडणारी मुले बघून बालपण अनुभवणारी,
पक्ष्यांची किलबिल ऐकूण हुरळून जाणारी......
बागेत उमललेली फुले  बघून उमलणारी,
निसर्गावर भरभरुन प्रेम करणारी,
गाणी त्याच रसिकतेने ऐकणारी,
घरच्यांची वाट बघतांना तीच जीवाची होणारी  घालमेल,
यात कुठे  आहे ती म्हातारी झाल्याची एकतरी खुण
मनाचा आरसा....खरे प्रतिबिंब  तोच दाखवेल
हं प्रतिबिंब  आता थोडे परिपक्व ,अनुभवी,प्रगल्भ दिसायले लागले  एवढेच .
 पण  त्यात यौवनाचा ह्यास...
छे , मुळीच नाही.
त्याचा तर मागमुसही नाही. 
उलट त्या त्या वयाच्या टप्प्यावर आलेल्या अनुभुतींनी लकाकी वाढलीय चेहऱ्यावर  आधीपेक्षा.
आज खूप दिवसांनी तेच पूर्वीचे हास्य उमटले 
तिला ती खरी भेटली आता.
बाहेरचा कोणताही आरसा तिचे तारुण्य ,तिचा उत्साह,तिचे हास्य नाही संपवू शकणार.
प्रत्येकाजवळ एक आरसा असावा असा
मनातला,नितळ, निर्मळ, धूळ न बसलेला.
आपले आरसपानी सौंदर्य दाखवणारा.
नव्हे तो असतोच
आपणच 'वरलिया रंगात'  आपले रुप विसरुन  मनाचा आरसा बाजुला सारतो
खोट्या प्रतिबिंबालाच खरे समजू लागतो.

प्रीती

Comments

  1. मनाचा अचुक वेध घेनारे शंब्दाकन,, वयाच्या एका टप्यात हे विचार मनात डोकावत असतात त्याचे वर्णण ....
    खुप छान ....
    सुरेंन्द बनसोडे

    ReplyDelete
  2. खर आहे ग वय हे वाढनारच आनी धाकधुकही वाढनारच पन खर आहे तुझ मनाच सौंदर्य खर...सौंदर्य

    ReplyDelete
  3. वा ! छानच टिपली आहे मनाची घालमेल..

    ReplyDelete
  4. सुरेख - आशिष

    ReplyDelete
  5. वा खूप सुरेख वर्णन केले आपल्या वयातील स्त्रीयाचे ... प्रत्येकाला एकदा तरी मनाच्या आरशात बघता आले पाहिजे.... राधा

    ReplyDelete
  6. अंतर्मुख करणार, वाढत्या वयाची जाणीव करून देणार लिहिलस छान

    ReplyDelete
  7. विशाखा..खूप छान...मंजु

    ReplyDelete
  8. कस काय इतकं छान लिहू शकते तू.. very nice. Shirish

    ReplyDelete
  9. उतार वयाचे अचूक विवेचन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

शब्दपर्ण