नवे आभाळ
कल्पनेच्या पलीकडे
शब्दांच्या पलीकडे
स्वप्नांच्या पलीकडे
रम्य,मनोहारी, सौंदर्याने परिपूर्ण
असेच काहीतरी असणार
अशीच समजूत होती आतापर्यंत.
आता अनुभवतोय सगळे सोबत.
कल्पनेच्या,शब्दांच्या,स्वप्नांच्या पल्याड काय असते ते.
अनाकलनीय,भयंकर काहीतरी
सरळ एका रेषेत चालणारे आयुष्य किती बिघडवले
एका साथीने
सगळं अधांतरी ,अनिश्चित चाललयं
कधी काय होईल
माहित नाही
संपूर्ण जग काळजीत
जीवन सुरळीत कधी होईल याची वाट बघत.
मनात सगळं सुरळीत होणार की नाही याची धास्ती
आधीचे दिवस परत येतीलच याची शाश्वती नाही.
घराबाहेर जायला बंदी
सतत बिझी असणारे माणसे
सगळे कामे सोडून घरात बसलेले
सगळी वाहने बंद
रात्री गजबजलेली ,झगमगणारी शहरे
आज दिवसाही झोपलेली.
आता बीमार झालो तर डाॕक्टरकडे कसे जायचे हे भय
नेहमी वाहनांनी भरलेले रस्ते खाली,
बाहेर आवश्यक कामासाठी गेलोच तर सगळ्यांशी अंतर ठेवायचे.
गरीब श्रीमंत सर्वांनी आपली कामे स्वतः करायची
उद्या काय होणार या विंवचनेत रात्र काढायची
जीवन अचानक संथ झाले.
अवघं जग हतबल आहे.
बरेच जण स्थलांतरीत होत आहेत.
रस्त्यावर फक्त जनावरे आणि हिरवी झाडे दिमाखात उभे आहेत.
त्यातली काही फुलाफळांनी लडबडली आहेत
रस्त्याला जिवंतपणा त्यांच्यामूळेच आहे.
तात्पुरते तरी त्यांचे जग आपल्यापेक्षा वेगळे झाले आहे.
आकाशातून विमाने हरवली.
तिथे आता पक्षी स्वैरपणे उडताहेत.
कुत्र्याचे भुंकणे,पक्ष्यांची मुक्त किलबिल
एवढाच आवाज ऐकू येतो.
अगदी दोनेक आठवड्यापूर्वी बातम्या बघतांना ,ऐकतांना किती अलिप्त होतो आपण.
ही आपत्ती आपले दार ठोठावेल असे कल्पनेतही वाटत नव्हते.
सर्वच कल्पनातीत.
कल्पनेच्या पलीकडे.
ही कल्पना आहे कि याआधीचे आयुष्य कल्पना.
हे स्वप्न आहे कि या आधीचे आयुष्य स्वप्न.
सगळेच भास,आभास.
काल एका मैत्रीणीशी बोलतांना सहजच ती बोलून गेली.
' कंटाळा आला आता असे आयुष्य किती दिवस आवडेल? उठा, जेवा,झोपा.काही दिवसांनी जगायचे कशाला? हा प्रश्न पडणारच.'
lockdown होऊन जेमतेम पाच सहा दिवस झालेले. एवढ्यातच ही अवस्था तर अजून पुढे ...
किती लवकर थकतो आपण,मनाने.
नाउमेदीने,थकल्या मनाने ,मनात नकात्मकता ठेवून आपण या साथीशी कसे लढणार?
बस् अजून काही दिवस....
हेही दिवस जातील.
थोडा संयम ठेवावाच लागणार.
वाट बघावी लागेल.
आपले दिवस येतीलच.
खरे म्हणजे एवढा मोकळा वेळ यानंतर आपल्याला कधीही मिळणार नाही.
सर्व सुरळीत झाल्यावर पुन्हा सगळ्यांची' वेळ नाही' ची तक्रार सुरु होणार.
म्हणून या वेळेचा आपण सदुपयोग केला तर.....
काहीजण करत आहेत.
अर्धवट राहीलेले
छंद जोपासत आहेत.
तर काहीजण उद्या काय होईल
याच विंवचनेत एकेक दिवस ढकलत आहेत
हे दिवस संपणारच यावर विश्वास ठेवला तरच
धास्तावलेलं मन शांत होईल.
दिवस घालवण्याचे वेगवेगळे मार्ग सापडतील.
कल्पनेच्या पलीकडे आपल्याला
रम्य गवसले नसले तरीही हे दिवस संपल्यावर
काहीतरी चांगले आपली वाट बघत असेल.
एक नवे आभाळ मिळेल आपल्याला. स्वच्छ आणि निरभ्र.
सफर बहोत है कठीन मगर
नही रहनेवाली ये मुश्किले,
के है अगले मोडपें मंजिले
प्रीतीदिप
Khup Chan..
ReplyDeleteछान
ReplyDeleteआकाश के उसपार भी आकाश है।
आकाश के बहते समय की तऱ्हा,
बहते रहो, जैसे बहे ,ये हवा
कभी ढूंढ लेगा ये कारवां
Deleteवो नई जमीं,नया आसमां.
This comment has been removed by the author.
DeleteMast g...
ReplyDeleteछान....मनातले लिहिलेस🙂
ReplyDeleteवाक़िफ़ कहाँ ज़माना हमारी उड़ान से
ReplyDeleteवो और थे जो हार गए आसमान सेछानच, सुंदर लिहिल.
खुप छान प्रत्येकाच्या मनातल लिहल प्रत्येक जन ऐका अनामिक भितिने जगत आहे सर्व काही असुन काहिच नसल्या सारख आहे...jyoti
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप छान लिहिले, मस्तच
ReplyDeleteसूंदर अप्रतिम
ReplyDeleteखरंच "आहे ते स्वप्न की पूर्वी होतं ते स्वप्न?" ..... छानच ! 👌👌.... लिहीत रहा .... आनंद
ReplyDeleteहे वाचल्यावर, पूर्वी जगत होतो तेच स्वप्न वाटत आहे आता. सगळ्यांच्या मनातल्या विचारांना तू शब्द दिलेस . थँक्स विशाखा ( प्रीती ).
ReplyDeleteविशाखा ....खुपच मस्त ....आशादायी लिखाण ...Be positive ,think positive ...
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteआभारी...पूजाजी.
Delete