शब्दफुले

'शब्दफुले' अमृताचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आज. 
वयाच्या पंधराव्या वर्षी बघितलेले स्वप्न फुलायला चाळीस वर्ष लागली तिला.
या मधल्या वेळेत घरच्यासोबत,घरच्यांसाठी बघितलेली कित्येक स्वप्ने पूर्ण  केली तिने .
     लहानपणापासून अमृता प्रितम आवडती होती तिच्या.
तिच्या कथा वाचता वाचता  या अमृताच्या मनात पण भावनांना शब्दरुप देण्याचे स्वप्न रुंजी घालायला लागले.
लिहिण्याची  असोशी असलेली ती मनात आलेले शब्द कागदावर उतरवूच नाही शकली कधी.
तिला असलेली लिहिण्याची ओढ नाही समजली कुणाला.
 रात्री चंद्रप्रकाशात शब्दांसवे बघितलेले शब्दांची स्वप्ने  पहाटे सुर्याच्या किरणात विरत गेली.
लग्न झाल्यावर लिहू असे म्हणत जोडीदारासोबत रममाण झाली.
जोडीदार साजेसा,गुणसंपन्न पण 
काहीसा शब्दांपासून दुरावलेला,अलिप्त.
त्याला  तिच्या शब्दांचा,स्वप्नांचा  अर्थ कधी कळला
नाही. 
मनात उमटलेल्या शब्दांना अंतरंगातून बाहेर येऊच नाही दिले तिने.
तिच्या मनातल्या शब्दांचा थांग घेतलाच नाही कुणी.
शब्द तरी किती वाट बघणार?  
गेले तिला एकेक सोडून.
ती पण विसरली मग अंतरंगातल्या शब्दांना.
अंतरले शब्द आणि  ती एकमेकांना.
  एकेक  जबाबदाऱ्यांना पार पाडू लागली.
भूलाबाईच्या 'कारल्याचा वेल लाव ग सुनबाई , मग जा आपल्या माहेरा माहेरा'.
गाण्यासारखे आयुष्य बनले तिचे.
एकेक जबाबदाऱ्या पार पाडतांना तिच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढत गेल्या.
 लग्नानंतरच्या नविन संसारात सासरच्यांची मने जिंका.
मुले,
मुलांचे संगोपन,
त्यांच्या शाळा,
त्यांचे करियर,
या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये शब्दांना जागा होती कुठे?
 जबाबदाऱ्या  संपता संपता वर्ष सरत गेले
आयुष्यातले.
आता जबाबदाऱ्या संपायला आल्या. 
एकमेकांत गुंतलेले धागे सैल झाले जरा.
गुंता सुटायला लागला.
शब्द रुंजायला लागले परत मनात.
मनाच्या गाभाऱ्यात शब्द उसळी घेऊ लागले पुन्हा पुन्हा.
आता नाही थोपवू शकली ती शब्दांना आतल्या आत. 
शब्द मोरपिसा सारखे हलके होत तरंगायले लागले.
ती भराभर शब्दांना कागदावर उतरवायला लागली.
   तीच ही शब्दांची फुललेली 'शब्दफुले'.
काही  शब्द बाहेर आलीत,
काही हरवली,
काही शब्दांचे अर्थ बदलले,
काहींचे संदर्भ   हरवले,
काही शब्दांमधला आवेग  ओसरला,
काही शब्दांची बेभानता कमी झाली,
काही शब्दांच्या आठवणी पुसट झाल्या,
तर काही आठवणींसाठी शब्दच भेटले नाहीत.
या अमृताची शब्दफुले  खूप आधीच फुलली असती तिला आवडणाऱ्या  अमृता सारखीच.
           तिलाही त्या अमृता सारखा इमरोज मिळाला असता तर.........

                      प्रीती/विशाखा

My twitter account is: @PreetiGajbhiye7
My FB account is: Vishakha Bhowate
You can also subscribe my blog.

Comments

  1. Smita Aurangabadkar
    छान मांडले आजचे कथानक
    प्रिती
    Keep it up nice dear

    ReplyDelete
  2. Vaishali joshi ....सुरेख ...मस्तच जमलाय ....कि ...शब्दांचा खेळ ......

    ReplyDelete
  3. Khupch Chan..shabd manatla..

    ReplyDelete
  4. It's always better than never. Talent cant hide forever. It sees the light of the day one day or the other.
    Heartwarming story, Preeti.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Anagha to visit my blog,you are right ---talent can not hide forever---पण काही आठवणी आणि शव्द हरवून जातात.

      Delete
  5. शब्द फुलांचा हा सुगंध वाटण्याचा अमर्याद आनंद !

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचं व्हॉट्स ॲप'चा नंबर आहे कां ?
      माझा 8511643442

      Delete
  6. सुंदर ! पुन्हा एकदा छान उतरलं आहे..... शब्दांमधला हळूवारपणा वाचकांना भावून जातो. Keep it up. - आनंद कुळकर्णी

    ReplyDelete
  7. काय लिहिते तू... जबरदस्त.. शिरीष

    ReplyDelete
  8. छान, साहित्यिक, चाकोरी बाहेरच, वेग वेगळे topics

    ReplyDelete
  9. खूप छान शब्द माला गुंफली तू !
    अप्रतिम
    शुभेच्छा तुला 👍
    ........मोहिनी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समर्पण-९

निरोप--- एक शाश्वत सत्य.

शब्दपर्ण

महिलादिन विशेष

जीवनगाणे-सप्तसुरांचे

अद्भुत जग---कथा क्र.-१०

गृहिणींचा प्रजासत्ताक

पूर्वसंकेत---एक गूढ

अद्भुत जग---कथा क्र.-५

नाजूका भाग-२