रकमीची भाकर ---(Guest author-ज्योती रामटेके)
मी आमासीक गंगीकड जाउन येतो पटकन
अन् मंग भाकरी बनवतो.
कायले चालली व , नीरा उडांरत रायत काल त्या सखू
वैनीकड गेली अन तटीसाच बसुन रायली.अटीसा माया पोटात नीरा कावळे बोंबले.तटीसा मस्त खायखुदाळा केला अन आली मंग माहारानीसारखी , आली न मस्त पसरली .मले सकायचे कुटके खा लागले
बापा ..
बापा लयच नवल आहे.मी तुमाले अशी हनहन करतो काय.मी जरास कुठ जाच नाव तोंडातून काढल की
बातच जीवावर येते तुमच्या ,मी नीरा घरात घुसून रायतो
मी घरात रायली कि तुमाले लय बर वाटते
अव ...रकमा तुया कायजीपोटी सांगितलं तुले
आन् तू भाकरबी टायमार नाई बनवतं.
सबन समजते मले .तुमाले मायी लयच कायजी आहे
मले माईत आहे ना बापा किती कायजी आहे त
मले काई झाल त तुमाले त बरच आहे
जाय बर...तुले साद बोलन बी समजत नाई
साद्या मनान सांगतो , तुले उरफाट लागते .
बोलाचा बी धाक आहे माया जीवाले
जातो मी...दीवा बत्ती करुन ठुजा
नाईत रहान त्या टी वी त डोक्स खुपसुन
अव त अटीसाच बारा वाजवत काय.
जाय लवकर
मले बी घंटाभर सुकान राउ दे
बर बापा...मायामुळ भांडन होउन रायले ना घरात
तीकडच रायतो मी.मायावाला लय तरास आहे तुमाले
जातो मी .काय निकदरा नवरा भेटला माय..काय करु बाई माय नसीब लय फुटक आहे
" कुठसा निंगाली व रकमा लयरागात दिसुन रायली
काय सांगू काकी माया करमाची कथा
तुमच पोरग नीरा मले बोलत रायते.ऐवढ करुन बी
नाव नाई माया कामाले.सकाई उठुन पानी भरतो .
सडा , सारवन ढोराले पानी पाजन कुटार टाकन समद
मायामांग लावुन दील .तुमच पोरग बापा लय अरामान
उठते .मंग मले हातात च्या द्या लागते. मंग झाडझुड
ढोरावासराच बी करा लागते , माय होत नाही त बुवाले
भुक लागते मंग पटापट दोन भाकरी थापुन देतो
बुवा चांगला दाबुन खाते.मले त दोन घास खाले फुरसत नाही भेटत.मंग दुपारच्या वक्ताले अजुन दोन भाकरी .
भांडे कुंडे कामाची त काई कमीच नाई मायज
भांडे नाई होत त दुपारचा च्या.मंग अजुन संधाकायचे कामं.ऐवढ करुन बी नाव नाही .सांग बीचारे अजुन काय करु
" अव रकमा तुले कवाचा पाउन रायलो अन तू काकी जवळ बसुन गप्पा करुन रायली .माया जीव नोता लागत
चल घरला लय रात झाली .तुयाशिवाय घराले घरपन नाही येत बापा .तु जराशी नाही दिसली त मले गमत नाही
चला बापा माया सैपाक बी रायलाबापा , घरात नीरा अंधार दीसुन रायला .तुमाले कीती
वक्ता बजावल होत .नीरा त्या टीवीत डोक्स खुपसुन रायता नीरा त्या चसम्याचा नंबर वाढुन रायला.
मी कुठसा गेली का लयच मजा रायते .नीरा त्या पारावर टवाळक्या करत रायता .ते तूमचे इदरफिसके दोसत कामाचे न काजाचे .घरामंदी त्यायला मुंगळे डसतात
अन् त्या पारावर बेजा गमते .नीरा हा..हा..हा चालू रायते
घरी तोंडाले नीरा कुलुप रायते. मी काई सांगाले गेली की नीरा मुकाटयाने बसता.
" अव मायमाजे मुकाटयाने बस...न..व
आमास सैपाकाचं पाय लय भुक लागली .
बापा लयच गडबड करुन रायले .ऐंकानद्या वकताले जरास लसन..बिसन नीसुन ठिवाव.कांदा बी कापुन ठिवाचा होतामायावाले दोन हात काय...काय करतीन व
कटायला बाई माया जीव त .माहेराला जाच नाव काढल की टम फुगता
अव माउले ....गप बस , अन भाकर कर बापा ..
बर...बर बसा मुकाटयान...बातच भाकरी करतो
बर बापा....भाकर होईसतोर बसा लागन मुकाट्यान
नाई..त ..रा लागन उपासी
आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
वाह वा एकदमच गावरान ठसका,
ReplyDeleteलईच भावली मले रकमाची भाकर
...........मोहिनी
सुंदर
ReplyDeleteगावाकडच्या routine च चांगल निरीक्षण kelay, छान
ReplyDelete