गृहिणींचा प्रजासत्ताक

 वाचक मंडळी १ फेब्रुवारी पासून रहस्यकथा आणत आहोत.
वाचकांपैकी कुणाला लिहायच्या असल्यास कृपयाआमच्या इमेलवर पाठवा.
gajbhiye.preeti1972@gmail.com )

गृहिणींचा प्रजासत्ताक

मोबाईलवर  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा एक दिवस आधीच झळकू लागल्या . आणि माझी म्हणजे एका गृहिणीची धावपळ सुरू झाली . 
मुलांचे गणवेश स्वच्छ धुवून कडक इस्त्री करणे , बुटांना पाॕलीश करून ठेवणे , नवरोबाचे पांढरे शुभ्र शर्ट  तयार ठेवणे,  त्यांनाही विविध क्लब , बँक , शाळा ईत्यादी ठिकाणी झेंडा वंदन साठी जायचे असते . तसे माझेही विविध महिला मंडळ, अनाथ आश्रम, कुष्ठधाम , ईत्यादी ठिकाणी झेंडा वंदन , सामाजिक ऊपक्रम अंतर्गत फळे,बिस्किटे,वह्या वाटप करणे , अशा कार्यक्रमामुळे  माझीही तयारी करावी लागते . जसे,   पांढरी सुती साडी  तिरंगी बांगड्या , फुलांचा शुभ्र गजरा अशी खास तयारी. त्यासाठी मी ताज्या शुभ्र कुंदकळ्यांचा गजरा माळीत बसले , सकाळी उशीर होऊ नये म्हणुन एक दिवस आधीच कामे आटोपणे सुरू होते   इतक्यात मोबाईल चाळत बसलेला धाकटा म्हणाला 
"अग आई !पहा न हा फ्रीडम फायटर्सचा व्हिडिओ "

मुले सध्या शुद्ध मराठीत नव्हे तर मिग्लिश बोलतात , म्हणजे निम्मे शब्द इंग्रजी ! 
चिरंजीवास बोलतं करण्यासाठी मी म्हणाले, 
" हं काय रे?  तुच सांग बर ,मी जरा कामात आहे , तू सांग मी ऐकते हं ! " 

"अग्ग आई ! या साऱ्या फ्रीडम फायटर्सनी  कित्ती ग्रेट वर्क केले ग " 

त्याचा  आश्चर्यचकित चेहरा पाहून मला  मुलं काही चांगलं पाहतोय याचा मनस्वी आनंद होत होता , पण त्याने  बोलाव म्हणून म्हंटल ,
" हो रे ...बर मग तुझं यावर काय म्हणण आहे रे ? "  

"आई,  हे पाहून मला पण काही तरी करावं असं वाटतय ...पण मी काय बरं करू ? 

"अग आई तु काय करतेस ग ? आपल्या कंट्री साठी .....आय मीन्... अग देशासाठी?" 

"अरे मी ना ....अं..."

मी खरच काय करते ?
आणि आठवायला लागले . मी कुटुंबाची केवळ झेंडा वंदनचीच तयारी करते . पण देशासाठी काय करते? रांगोळीत  तिरंगा काढणे वा मुलांच्या गालावर तिरंगा रंगवणे , छोटे झेंडे करून देणे ,  झेंडावंदनला जाऊन येणे यापलीकडे  काय करते ?
 मला उत्तर सापडत नव्हते..
असे कसे  आपण ?
विचारचक्र फिरायला लागलं , आतून आवाज आला.... पोटतिडकीने मन म्हणत होतं . 
पण माझेही माझ्या देशावर खुप खुप प्रेम  आहे . 
कितीतरी लोकांनी बलीदान करून हे स्वातंत्र्य मिळवलं याची जाणिव मला आहे .

 मन म्हणालं. " थातुर मातुर कपडे बिस्किटे वह्या वाटून फोटोत झळकणे ही देशसेवा आहे का ?  किती खरी ?  ज्यांनी स्वतःच्या प्राणाची , घरादाराची आहूती दिली,  

त्यांच्यासमोर मला माझीच लाज वाटली .
मला हे  सत्य ठाऊक होतं , की स्वातंत्र्याशिवाय आपणा सर्वांना पशूपेक्षाही वाईट  दयनीय जीवन जगावे लागले असते . आज त्यांच्या बलिदानामुळे मी, आपण सारे स्वतंत्रपणे  आनंदात ,सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगत आहोत . हे खरे ,पण.... ज्यांच्यामुळे हे लाभले  त्यांची मनात कृतज्ञता ठेवणे किंवा देशावर खुप प्रेम आहे असं म्हणणे तसे कोरडेच नाही का ? 
आता माझी चिमुकली पण विचारू लागली . आई मी पण देशासाठी काही तरी करणार . सांग काय करू ? 
मी डोळे मिटले मनात त्या सर्वच महापुरूषांना ,वीर जवानांना,शहिदांना, वीरांगणांना वंदन केले. आणि रामसेतुतली खारूताई माझ्या डोळ्यापुढे आली . नवा ऊत्साह आला  , दिशा  मिळाली , मार्ग दिसला हुरूप आला. 
 जरी मी एक सामान्य गृहिणी असले तरी मी छोटेसे काही करू शकते . मी माणूस आहे . असहाय्य पशू तर नाही ना . बस ...सर्व सजीवात मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे.  बुद्धी आहे 
 ती वापरू. निश्चय केला . मुलांना सांगितलं  मी आणि आपण सारेच निश्चय करू की
 देशात योग्य सरकार येण्या साठी प्रत्येक वेळी मतदान करणार .
कितीही घरात अडचण येवो , दुःखी घटना वा आनंद चे कार्य असो मतदान करणारच.
देशहित जपणाऱ्या  , प्रामाणिक  व्यक्तीस मत देणार , कुणी लाच दिली तरी देशाशी बेईमानी नाही ,  मत विकणार नाही , गद्दारी नाही देशहित महत्वाचे . कारण अयोग्य व्यक्तीला निवडून दिले  तर देशाची प्रगती नाही , नागरीक सुरक्षित राहणार नाही , गुंडगिरी वाढेल म्हणुन देश सुरक्षित तर आम्ही सुरक्षित.  
आणि दुसरा निश्चय हा की  देशाची नैसर्गिक संपत्ती जसे वीज ,पाणी , पेट्रोल इत्यादी इंधने जपुन वापरणार.
 अशी मी प्रतीज्ञा घेत आहे ! 
कुठल्याही प्रसिद्धी , पेपर , फोटो , नेम फेम साठी नाही तर माझ्या स्वतः साठी आत्मसन्मानासाठी !! 
मुलीने चटकन लाईट बंद केला , खिडकी ऊघडली आणि  प्रकाशासोबत आनंदाचे वारे घरात . मनात आले 
उड्या मारत मुलीने जाहीर केले ,

 "आई, मी शाॕवरपेक्षा बादली घेईन , अर्धा पेला पाणी घेईन, खोलीतले दिवे बाहेर जाताना बंद करेन " 

चिमुकलीचे बोलणे ऐकून खुप आनंद झाला. 
पुढे ऊत्साहाने मुलांना सांगितलं ,
 की पहा , आपण हे पण  करू शकतो बरं ,

" काय ग ? " 
दोघांनी कान टवकारले.  
सांगते हं. 

आपण स्वतःशक्य तेवढे भारतीय वस्तुंचा वापर करायचा. प्लास्टिकचा कमीतकमी वापर ,  परदेशात  वागतो तसे इथेही नियम पाळून . जसे,  तिथे सार्वजनिक स्वच्छता पाळतो तसेच आपल्या आजुबाजूला, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे , सुका ओला कचरा वेगळा ठेवणे , ओला कचऱ्याचे खत करणे.
 ही लिस्ट आता वाढतच जाणार होती.

मुलगी म्हणाली 

"दो रूपये भी बहोत बडी चीज है बाबू"
मी म्हटलं

" छोटीसी देशसेवा भी बडा आनंद देती है बेटा  "

मन आनंदाने देशाभिमानाने भरून आलं.

जय हिंद !
वन्दे मातरम !!

              ..........लेखिका............

          ..........सुचिता पेंसलवार........


आमच्या blog वरील सर्व कथा खालील फेसबुक पेजवर मिळतील.

आमच्या फेसबुक पेजची link
 https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
 

Comments

  1. खुप छान लिहिले.
    खरे आहे आपलेही काही योगदान असावे.

    ReplyDelete
  2. सुंदर लिहिले ग ....खरेच लहान मुलांच्या मनात ही भावना बिंबवली पाहिजे ...तू छान शब्दांत मांडले ....jyoti

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेखन🌹 सुंदर लिहिले आहेस 🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

शब्दपर्ण

समर्पण-९

महिलादिन विशेष