अद्भुत जग---कथा क्र.-१०

वाचक मंडळी, 
विषय एक कथा अनेक
या आमच्या कथामालिकेत आम्ही नविन विषय घेऊन आलो.
अद्भुत  जग--- या विषयावर  पूर्णपणे काल्पनिक असलेल्या कथा आहेत.
वादातीत असलेल्या या विषयावर लिहितांना एक गोष्ट जाणवली.काल्पनिक असले तरी लिहितांना अद्भूतता आणि थरारकता स्पर्शून जाते.
अर्थात वाचकांच्या सुचनांचे स्वागत आहेच.

अद्भुत जग---कथा क्र.-१०


वसुधा खूपच आनंदी होती कारण ही तसेच होते. आज तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता, आजपासून ती आत्मनिर्भर होणार होती आणि त्याचा आनंद  गगनात मावत नव्हता. तिने आणि तिच्या आईवडिलांनी सोसलेल्या अपार कष्टाचे यश आज झाले होते .वसुधा झेडपीच्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होणार होती. ती एका गरीब आई बापाची एकुलती एक पोर होती.
 रखमा आणि गणपा अशा ऊस कामगारांची वसुधा ही दिसायला अतिशय देखणी आणि बुद्धीने तेवढीच तल्लख. मनातल्या मनात रोज विचार करायची, आपण जसे आयुष्य जगतो तसे आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून दोघे नवरा-बायको रात्रंदिवस कष्ट करायचे. कारखाना जवळ एक शाळा होती , ते दोघे रोज कामावर जाताना वसूला (वसुधाला ते प्रेमाने वसू म्हणायचे ) ते तिला या शाळेत सोडून जायचे.
 पाटी आहे तर पुस्तक नाही आणि पुस्तक आहे तर पाटी नाही. अशी तिची अवस्था .हुशारीला परिस्थिती अडवू शकत नाही असं म्हणतात त्याच न्यायाने वसु वर्गात बाई काही शिकवतात ते मन लावून  ग्रहण करायची. 
आई-बाबा शाळेत घ्यायला येईपर्यंत त्याचे मनन चिंतन करायची. शिकलेल्या बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायची. शाळेचे सर्व शिक्षक  तिच्या चुणचुणीत पणावर आणि हुशारी वर खूप खुश असायचे. वसू आता एक वर्ग पुढे जात चौथीच्या वर्गात गेली. कदम मॅडम तिच्यावर जास्त खुश असायच्या
त्यांनी एक दिवस तिच्या आई-वडिलांना शाळेत बोलावले आणि नवोदय शाळेविषयी माहिती सांगितली .तिला एक परीक्षा पास व्हावी लागेल आणि तिचे पुढचे शिक्षण सरकार करेल आणि ती पास झाली तर तिला बाहेरगावी जिथे नंबर लागेल तिथे शिक्षणासाठी जावे लागेल असे सांगितले.कदम मॅडम पूर्णपणे ओळखुन होत्या चौथी पास झाल्यावर तिचे आई-बाबा शाळा शिकवणार नाही तर नाहीतच पण लहान वयातच तिचं लग्नही लावून देतील म्हणून कदम बाईंचा आटापिटा सुरू होता .

ती पोर शिकली पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत होते. एक-दोन वेळा बाईंनी दोघांना समजून सांगितल्यावर ते पोरगी बाहेर शिकायला ठेवायला तयार झाले. तेव्हा ते म्हणाले आम्हाला यातले काही कळत नाही तेव्हा सर्व काही तुम्हाला पाहावे लागेल. 

ठीक आहे 

कदम मॅडम म्हणाल्या . त्यांनी तिचा फॉर्म भरला आणि तिला‌‌ तालुक्याला घेऊन गेल्या. परीक्षा दिल्यानंतर आता त्यांना चिंता होती तिच्या निकालाची. निकालाचा दिवस उजाडला शाळेच्या वर्तमानपत्रात पास झालेल्यांची यादी होती. बाई भर भर नजर फिरवत पेपर बघत होत्या, अचानक त्यांची नजर एका नावावर खिळून राहिली 

वसू परीक्षात जिल्ह्यात पहिली आली होती. 
हे पाहून बाईंचा आनंद गगनात मावेना . त्यांनी तिला बोलवून घेतले, जवळ घेतले कुरवाळले. तिच्या आई-बाबांना सांगितले त्यांनाही खूप आनंद झाला .त्यांच्या घरातील चालता-बोलता रेडिओ म्हणजे वसू बाहेरगावी शिकायला जाणार होती.  ठरल्याप्रमाणे व्यवस्थित राहण्यासाठी लागणार्‍या सामानाची कशीबशी जुळवाजुळव करुन तिला घेऊन रविवारी जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचले .

तिला तिथेच सोडून आई-बाबा परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा आई बाबांना बिलगून वसु खुप रडली. चांगला अभ्यास कर असे आईनं सांगितले .बाबांनी पाठीवर हात ठेवून, आम्ही आहोत घाबरू नको 
असा  धीर दिला. वसतिगृहावर वसू सर्वात शेवटी आल्यामुळे सगळ्या रूम भरल्या होत्या त्यामुळे तिला शेवटच्यारूम मध्ये राहायला जावे लागणार होते. लवकरच कोणीतरी येईल या आशेवर ती त्या रूम मध्ये राहू लागली तिथेही ती तिच्या हुशारी ची चमक दाखवत होती . 
पण ती तिथे खूप घाबरायची. तिला वाटायचे, आपण इथे का आलो .तिच्या वर्गमैत्रीणीला ती रोज तिची व्यथा सांगायची पण त्याही दिला तेवढ्यापुरता आधार देऊन शाळेत रमायच्या.

 त्यादिवशी वसु दिवसभर खूप दमली होती रूमवर आता तिने सर्व कामे आटोपून झोपायला बेडवर गेले तेव्हा रात्री बरीच झाली होती .अचानक तिच्या दरवाजावर टकटक असा एक आवाज आला. तिने दरवाजा उघडला एक स्त्री उभी होती. वसु घाबरतच म्हणाली, 

कोण हवंय? 

मी येथे गावातल्या एका शाळेवर शिक्षिका म्हणून आले आहे आणि मी आता काही दिवस येथे तुझ्या सोबत राहणार आहे आणि तशी मी या हॉस्टेलची परवानगी घेतली आहे असे तिने सांगितले .

वसु म्हणाली, 
अरे वा छान  झाले कारण मी या रूममध्ये एकटीच असते.

वसु मनातल्या मनात खूप आनंदी झाली होती कारण आता तिला सोबतीला कोणीतरी मिळाले होते.
 त्या बाई वसूला म्हणाल्या , 

मला सकाळी लवकर जावे लागणार आहे आणि शाळेची सर्व कामे आटोपून मला रूम वर यायला थोडा उशीर होणार आहे तेव्हा तू तुझी झोपायची वेळ झाल्यावर दार बंद करून झोपत जा. 

वसुने होकार दर्शविला .
त्या दिवशी वसू शांतपणे झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती उठून बघते तर बाई रूमवर नव्हत्या तिला रात्री 
सांगितल्याप्रमाणे आठवले. सकाळी लवकर गेल्या असतील म्हणून तिने तिच्या मनाची समजूत घालून घेतली. आवरून शाळेला गेली.
त्या प्रमाणे एक एक वर्ग पुढे जात होती तिने यावर्षी दहावीची परीक्षा दिली.

 रोज रोज रात्री नित्यनेमाने ती बाई रात्री तिला भेटायला यायची . आता वसु  डीएडच्या प्रवेशासाठी विचार करू लागली आपले उच्च शिक्षण व्हावे असे वाटू लागले. लहानपणापासून तिच्यावर शाळेतल्या कदम बाईंचा प्रभाव पडलेला होता .आता ती वसतीगृह सोडून कॉलेजात प्रवेश घेणार होती बऱ्याच मुली ह्या कॉलेजला जाणार होत्या. तेव्हापासून  ठरवले आपण येथे प्रवेश घ्यायचा.

 ठरलेल्या दिवशी आपले सर्व सामान भरून स्वतः बाबा ची वाट पाहू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना वस्तिगृह सोडायचे होते, त्या रात्री तिने उशिरापर्यंत  बाईची वाट पाहिली पण त्या रूमवर आल्याच नाहीत. तिने त्याविषयी चौकशी केली,  तेव्हा ऑफिस मधून तिला माहिती मिळाली की 
अशा कुठल्याही बाई व कुणीही बाहेरचे राहत नाही बाहेरच्या कुणालाही वसतीगृहात राहता येत नाहीत असा नियमच आहे .
तिच्या मनात अनेक प्रश्न उद्भवले, 
 मग  एवढ्या दिवस माझ्याबरोबर राहिली ती कोण असावी ती खरच असेल की नाही.असेल तर मला पुन्हा भेटल्या असत्या आणि नसेल तर कोण........ असेल तर..

तिच्या डोक्यात संशयाचा भुंगा पोखरू लागला ती तसेच विचार करत बसली असता भर दुपारी तिला न्यायला  आई बाबा आले त्यांनी तिला घट्ट मिठी मारली .आता त्यांना त्यांच्या गावी जायचे होते आणि त्यानंतर वसू तिला मिळालेल्या त्या ठिकाणी जाणार होती. आईनं आणलेल्या भाकरतुकडा पोटात घातला ढसाढसा पाणी पिले आणि आता बस स्टॅन्ड वर आले तेथून बसमध्ये बसून गावी निघाले बस आता फक्त तालुक्याला पोचत होती. जवळपासच्या गावी चालत जावे लागे. आता गाडी तालुक्याच्या स्टँडवर थांबली. गाडीत मोजकीच माणसे होती आजूबाजूला गावची माणसं होती जो तो आपल्या गावच्या रस्त्याने चालता चालता झाला. रात्र बरीच झाली होती. ती आणि तिचे आई बाबा आपल्या वस्तीचा रस्त्याला लागले. छोटीशी पायवाट आणि अरुंदही  दोन्ही बाजुला दाट झाडी आणि कीर्रर्र रात्र. अशात ते तिघे रस्ता चालत होते काही अंतर चालायला लागल्यावर त्यांना कसला तरी आवाज झाला कोणीतरी आपल्या पाठीमागे चालत येत आहे त्यांनी कानोसा घेतला त्या अंधारात एक उंच धिप्पाड स्त्री, हातात कंदिलाचा प्रकाश घेऊन येताना त्यांना दिसली. ती जवळ आली.

एवढ्या अंधार्‍या रात्री, उशीर  झाला गाडीला नाहीतर लवकर पोचलो असतो घरी, 
बोलता-बोलता त्या स्त्रीने वसूचा हात हातात धरून चालू लागली. यांनाही वाटले त्यांना कुणीतरी सोबतीला आणि बोलायला मिळाले .मी तुमच्या गाडीत होते मागे बसले होते म्हणून मलाही उशीर झाला 
असे तिने स्पष्टीकरण दिले वसुचा हात तिच्या हातात होता गावाच्या सीमेवर आले अचानक लख्ख प्रकाश पडल्यासारखे वाटले तिघेही भानावर येऊन काही तरी बोलायचे म्हणून मागे वळून पाहतात तर काय कोणीच नाही त्या तिघांनाही दरदरून घाम फुटला आता आपल्याशी बोलणारी ती बाई कुठे आहे म्हणून त्यांना इकडे तिकडे पाहीले पण तिथे या तिघांशिवाय कोणी ही नव्हते ते प्रचंड घाबरली होती कसेबसे ते घरी पोहोचले वसूच्या डोक्यात आता पुन्हा त्या आपला हात हातात धरून चालणार स्त्री विषयी अनेक विचार येऊ लागले आई बाबा लगेच झोपी गेले पण वसूला काही केल्या झोप येईना तिने आई बाबांना मध्येच उठून विचारले 
आई बाबा भूत असते का? 
ते म्हणाले 
तसं काही नसतं, झोप आता .
पण तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. 

दुसऱ्या दिवशी वसु आई बाबांना म्हणाली 
आपण माझ्या शाळेवर जाऊ कदम बाईंना भेटू त्यांना खूप आनंद होईल. 
आई-बाबा हो म्हणाले ,दोन चार दिवसांनी ते तिच्या शाळेवर गेले वसू मनात खूप आनंदी होती तिला तिच्या लाडक्या बाईं भेटणार होत्या.
 मी शिक्षिका झालेलं पाहून कदमबाईंना खूप आनंद होईल असे तिला वाटत होते. पाहतात तर काय तिथे मोडकीतोडकी शाळा ,ओसाड पडलेल्या वर्गखोल्या .तिथेच ऑफिस होते, तेही मोडके तोडके झालेले. तिचा हिरमोड झाला कदम बाई कुठे असतील असा विचार तिच्या मनात आला तिने ऑफिसमध्ये डोकावून पाहिले भिंतीवर कदम बाईचा फोटो  त्या या जगात नव्हत्या..... शेजारीच एक म्हातारा माणूस काहीतरी काम करत बसलेला होता व तिने  त्याला त्याविषयी विचारले तेव्हा त्याने सांगितलं, 

खूप चांगल्या होत्या कदम बाई. त्यांना मूलबाळ नव्हते ,शाळेतल्या मुलांना आपली मुलं समजायच्या.अल्पशा आजाराने त्या गेल्या....  

त्यानंतर शाळा दुसरीकडे स्थलांतरीत झाली 
वसुच्या मनाचा थरकाप उडाला तिला सर्व काही आठवलं म्हणजे 
माझ्याबरोबर राहणाऱ्या माझा हात हातात धरून चालणाऱ्या  बाई दुसऱ्या तिसऱ्या  कोणी नसून ...
                          लेखिका
          ......सिंधु व्हटकर(सोनवणे).....

वाचक मंडळी,
अद्भुत जगातील अद्भुत कथा आवडत आहेत ना.
please share and follow our blog.

अद्भुत जगातील याआधीच्या कथाही तुम्हाला आवडतील.

Comments

  1. Very nice and engaging story.

    Please keep writing

    All the best

    ReplyDelete
  2. खूप छान
    वैशाली जोशी खोडवे

    ReplyDelete
  3. खूप छान
    वैशाली जोशी ..खोडवे

    ReplyDelete
  4. छान लिहिले ...मस्त ...थरारक कथा...jyoti

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेखन..... सुंदर लिहिले आहेस.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

शब्दपर्ण

समर्पण-९

महिलादिन विशेष