इच्छामरण.....


."".सांईहाॕस्पीटल""भव्य उदासवाणी इमारत ..बहुधा तशीच असते दवाखाना म्हंटल की ,,मोजुन त्या  बारा पायऱ्या ...न आवडणाऱ्या.

  दुर्दैवाने या दोन वर्षात तिसरी खेप होती ....इथे येण्याची ...तो भयावह काॕरीडोर ..घाबरलेले ..नाऊमेद आस्थेवाइकांचे  चेहरे पाहुन आपसुकच  काही तरी सुटत़य हातच अस वाटत ..त्यात ही  रात्र ,ओढून ताणून पसरवलेला  अधिकच पांढरा शुभ्र प्रकाश ,जिकडेतिकडे भावशुन्य काम करणारी, कर्तव्य निष्ठ माणसे.....
काॕरीडोरच्या शेवटापासून पहिल्या  चकचक चमकणाऱ्या  बाका वर ..

पांढऱ्याशुभ्र राखाडी काठा च्या साडीतील  थोडी स्थुल पण बांधे सूद ,रेखीव ... पन्नास पंचावन्न वय  गाठलेली  ..पाठ टेकेवून ,डोळे मिटवुन,काहीशा हताश अवस्थेत बसलेली रोहिणी,
(रवि ---मुलाचा प्रवेश)

रवि : आई ,अग  आई ,तु बाहेर का बसलीस.बाबांजवळ बसायच न .

ऱोहिणी : अरे त्यांचा डोळा लागला ..म्हणून जरा बाहेर आले ..एव्हाना तिथेच बसले होते ,जरा घाबरल्या सारख झाल, म्हणून बसले बाहेर.
आणली औषधे सगळी ?
समजावून  सांग मला कशी द्यायची ...मग गडबड झाली की ओरडा घालतोस तू.

ऱवि: सांगतो ..(सगळ समजवुन सांगतो)मला जाव लागेल घरी ...तु थांब इकडे ..काही लागल तर ज्या ड्युटी वर आहेत त्या नर्सेस ला सांग .डाॕ. म्हणाले ,बाबांना झोप लागेल ते सकाळीच उठतील म्हणुन .. देव येतो सकाळी, चहा पाठवतो सोाबत त्याच्या..

 रोहिणी :बर.
 रवि निघुन जातो .जडपावलांनी रोहिणी आत येवुन दार टेकवते.  लांब श्वास घेते,थकवा आलाय मनाला., तनाला जाणवत तिला.
बाजुच्या पलंगा वर अंग टाकते, काल तिचा डोळा नुकताच लागला असेल ह्यांनी (राम रोहिणी चे यजमान)आवाज देऊन सांगीतल ,
जीव घाबरुन राहिल्याचं ...झाली धावपळ ,,दवाखाना .....थोड औषध आराम ...आताशा असेच व्हायचे . (बरोबर दहा वर्ष झाली ,रामला लकवा होऊन .)या दोन वर्षात तीनदा दवाखान्यात  भरती केलेल त्यानां.
एखाद्याच आयुष्य कस असत न आकलना पलिकडलं. रोहिणी विचार करु लागली .

फारच थोड्या अपेक्षा होत्या आयुष्या कडुन ....लग्न होऊन आले ..पहिल्याच रात्री यजमानांनी आई ची कथा सांगीतली होती ..बाबा लहानपणी गेल्याच ...आई नी किती सोसुन आम्हाला वाढवल्याच  ..मी फार लहान होतो, नी शेवटी तिला कधीच दुखवु शकत नाही.. इथवर....

    सासू बाई फारच    सुज्ञ  होत्या ...मुलावर अती प्रेम करणाऱ्या  ..घरात एकछत्र राज्य करण्याच  हुनर होत त्यांच्यात ,बेता ची आवक ...बांधलेल चाकोरी बद्ध आयुष्य, मुल झाली .....दोन मुल ....एक मुलगी ., सर्व सुखात सुरु होत , यजमान आई आई .करायचे ,आई बाबु बाबु ,,,,अस सगऴ गोकुळ होत,  सगळच होत पण अपूर्ण .
    
आयुष्यात प्रेम होत पण लक्ष नव्हत कुणाचच ...मनाला थारा नव्हता कुणाचा,छोट्या छोट्या अपेक्षा आ वासुन उभ्या रहायच्या नि मन दम कोंडेस्तोवर सहन करुन केविलवाणे  होवून मलूल पडायच .सासुबाईंचे एकछत्री राज्य ,घरात त्या मुळे  माहेर आपसुकच दुरावल होत ..माहेर बेताचेच असल्या मुळे कुणी दखल ही घेई ना..."

"काटेरी कुंपणात दडलेला केवड्याचा सुवास" 

म्हणतात न तसेच काहीसे होते आयुष्य  चे रोहिणी चे,मुलांच्या  सोबती ने जीवनाला सुखा ची झालऱ लागली होती ...मुले हुशार समंजस ..देखणी ,

पण राम ची हां .चांगल जे जे ते राम च ,हसायला पण येई कधीकधी ,राम किती नशीबवान आहेत ,आजी चे पाहून मुले ही बाबांवर अतोनात प्रेम करीत ,बाबा एके बाबा .प्रथाच पडली म्हणा की घरात ....
जाऊ देत ,,,प्रसंग कुठला ..विचार काय  करतोय आपण....हे मन पण नं .....

रोहिणी  ऩाम स्मरण करत निजण्या चा प्रयत्न करु लागली,कधी डोऴा लागला ,कऴलच नाही..दारा वर च्या टकटक आवाजाने जाग आली ....राम गाढ झोपले होते ....दार काढल ,देव आला होता....

देव : बाबा उठले नाही का ग .आई तु इथेच फ्रेश होऊन जा ,चहा घेऊन घे .आई अग तुझा औषधीची चिठठी तू दिली मला ,मी कुठे ठेवली, आठवतच नाहीय ,घरी गेली कि शोधुन देशील बर,आणेन तुझ औषध आज .....
ऱोहिणी :::::::हो रे आणशील .....मी येते वाॕशरुम ला जाऊन .

सहा महिन्या नंतर...............

आभा: आई शेजार चे राम काका  गेले  का ग ?
गर्दी दिसती य त्यांचा घरा समोर.

आई:अग बाई हो ग..काय झाल असेल, काल तर सगऴं ठीक होत ,थांब जाऊन येते मी ...(शेजारी जाऊन तासा भरात परत येतात)

आभाची आई : विपरीतच घडल ग ..आजी गेल्या , आजोबा नाही....हो न  आजोबा च आजारी  होते . पण रोहिणी ताई  कश्या काय गेल्या काय माहित....हार्ट फेल झाला म्हणे.....दवाखान्यातही  पोहचू शकल्या नाही ग..(खिन्नतेने ,विचार करत)म्हणायच्या नेहमी, मुल फार करतात हो ह्यांच, माझ नको बाई वाट्याला यावे अस  ..

मन काढल च होत ग ,त्यानी जगण्यातून , यंत्रवत जगत होत्या .गेलेल बर ,अस सारख वाटायच.
इच्छा मरण मागुन घेतल ग त्यांनी देवा कडे ...
फारच धीरा ची बाई होती.
आयुष्य भर गृहीत धरल्या गेली...
सासु द्वारे,नवऱ्या द्वारे ,अनुषंगाने मुले ही गृहीतच धरीत त्याना.मर्जी म्हणून नव्हतीच त्यांना...त्राण असेस्तोवर दरारा  सहन केला ,नंतर सेवा केली सासुबाई ची .,त्या गेल्या वर उसंत असावी तर यजमानांना  अर्धांगवायुचा झटका आला, सगळे उपचार केले ...गुण नाही आला ...अंथरुणाला खिळले .  .झाल संपल होत आयुष्य रोहिणी ताईंच... कसली हौस मौज नाही का कुठे येणे जाणे नाही  ...कसे कसे म्हणून  काहीच नाही. 

...फारच सोसल होत रोहिणी ताईंनी .. मला आठवत, राम काका दवाखान्यातुन तिसऱ्यांदा डिस्चार्ज होऊन घरी आलेले न, मी भेटायला गेले, तर त्या थिजुन गेलेल्या जाणवल्या मला..जणु काही ..काही तरी ठरवलय त्यांनी ..त्यानंतर मला कधी म्हणून हसलेल्या जाणवल्याच नाही .... कुठली पूजा नाही,,का कुठल्या सणा चा उत्साह नाही.  तश्या त्या फार हौशी होत्या ग ..मरगऴ ओढवून घेतली होती त्यांनी ...
मला म्हणाल्या होत्या ,

       आता ह्या देहाला मुक्ती हवीय  ताई,औषध नको ,थकला आता जीव .सारख मरण मागत होत्या  देवा कडे त्या ...थकल्या होत्या काकांच करुन करुन ....
""""""इच्छा मरण आहे ग हे """"".. मुक्ती मिळवली त्यांनी , या आकांतातून ,,मागुन घेतल मरण  देवा कडे , पुरविली देवा नी इच्छा त्यांची,,दावली देवा नी त्यांना वैकुंठा ची वाट..सुटल्या बिचाऱ्या ,
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो .....
ऊँ शांती........



@सरिता विलास बायस्कर
9665298503


फेसबुक पेज link

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

Comments

  1. खूपच छान लिहिले वहिनी .स्त्री मनाची व्यथा छान व्यक्त केली

    ReplyDelete
  2. Khup sundar likhan
    Chan subject nivadala
    Keep it up dear 👍🏻

    ReplyDelete
  3. धन्यवाद मैत्रिणींनो

    ReplyDelete
  4. धन्यवाद मैत्रिणींनो

    ReplyDelete
  5. धन्यवाद मैत्रिणींनो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

शब्दपर्ण

समर्पण-९

महिलादिन विशेष