आणिक काय हवे?
उंबरठा ओलांडून आज बाहेर पडली मधुरा.
का?कशासाठी ओलांडला उंबरठा?
लौकिकार्थाने सगळेच तर होते तिच्याजवळ.
मग आणिक काय हवे होते तिला?
घर सोडण्याचा मनात खूपदा आलेला विचार आज अमलात आणला तिने.चूक कि बरोबर माहित नाही पण तिने यावेळेस मनाने घेतलेला निर्णय मधुराने मानला. मानला .
मनाचे द्वंद्व संपवले आज.
विवेकवर खूप प्रेम असूनही उंबरठा ओलांडला तिने.
काय नव्हते उंबरठ्याच्या आत जे तिला उंबरठ्याच्या बाहेर मिळणार होते?
आणिक काय हवे होते तिला?
स्वातंत्र्य ?जिवंतपणा?
मधुरा अवखळ,जीवनाचा पूरेपूर आनंद लुटणारी,संगिताची आवड आणि त्यात पारंगत असलेली. फुलपाखरासारखी स्वच्छंद जगणारी,जगण्यात रमणारी.
तीस वर्षापूर्वी माप ओलांडून विवेकच्या घरात आली त्याची जीवनसंगिनी बनून.
घरात विवेक,सासरे,एक दीर आणि एक ननद.
विवेक घरातला मोठा मुलगा म्हणून आपसूकच तीही मोठी सून बनली. घरातली मोठी म्हणून जबाबदाऱ्याही जास्त.
तिचे माहेर आणि सासर यांच्यातील अंतर लग्नानंतरच्या आठ दहा दिवसातच लक्षात आले तिच्या . या अंतराने लवकरच प्रगल्भ झाली ती.
सासरे अधिकारी पण विचार जूनाट. सुनेने पहाटेच उठून दिवसभर कामे करावीत या विचाराचे. ननद तिच्यापेक्षा वयाने मोठी पण वहिनीने जेवणसुद्धा वाढून द्यावे ही अपेक्षा. जावई सासुरवाडीला राहणारा पण त्यालाही मानपान हवाच असायचा
दिर सगअळ्यात लहान म्हणून लाडावलेला.
आणि विवेक त्याच संस्कारात वाढलेला.त्याचे विचार वेगळे कसे असणार?
मधुराने त्याच्यासकट सगळ्यांना खूष करावे ही त्याची इच्छा.
बायको बद्दलची त्याची मतेही जुनाटच होती.
त्याची मते तशी दर्शवायचा नाही तो.
मधुराची काळजी आहे असे भासवत राहायचा.तीही त्यालाच प्रेम समजायची.
पण जसजसा वेळ गेला स्वभावातला वरवरचा मुलामा गेला. घरी तो मोठा असल्यामूळे त्याच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. त्यामूळे एक प्रकारचा पुरुषी अहंकार होता त्याच्यात.नेमक्या याच गोष्टीचा मधुरेला त्रास व्हायचा.झुकणे किंवा तडजोड करणे त्याच्या स्वभावात नव्हते. त्याला जे पाहिजे तेच व्हायला हवे असायचे त्याला. कायम मधुराने झुकत राहायचे.
सकाळी ऊठा,सगळ्यांचा चहा,नाश्ता,जेवण, डब्बे, बाकिची कामे यातच पूर्ण दिवस संपून जायचा.
ननद आणि तिचा नवरा इकडेच राहायचे.
एक वर्ष इकडे राहल्यानंतर विवेकची मुंबईला बदली झाली. विवेक आणि सासरच्यांना मधुराने सासरीच राहावे असे वाटत होते. ती राहलीही सहा महिने. पण दिवसभर सगळ्यांची कामे याशिवाय जीवनात काहीच नव्हते म्हणून ती हट्टाने विवेकसोबत मुंबईला गेली.
मुंबईला दोघांचेच वेगळे असे आयुष्य सुरु झाले.
एकदोन महिने झाले कि विवेक सासरी तिला घेऊन यायचा. सासरच्या घरातील साफसफाई,पेंडिंग कामे करुन परत मुंबईला जायचे.
मुंबईला गेल्यावर एका वर्षात विभा आणि तिच्या पाठीवर तीन वर्षानी वैभव जन्माला आला.
सासरी आता दिराचे लग्न झाले होते. पण ही मोठी म्हणून हिच्याबद्दल ज्या होत्या त्या अपेक्षा तशाच राहिल्या. शिवाय धाकटी मिळवती होती.
त्यामूळे तिच्याकडून ते अपेक्षा करुही शकत नव्हते.
विभा आणि वैभव मोठे होत होते
मधुराला गाण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती.
विभालाही तिच्यासारखीच संगीताची आवड होती.तिला एका नावाजलेल्या संगीतशाळेत प्रवेश घेतला. तिलाही तिथे सितार शिकायला जाण्याची इच्छा होती पण विवेकने नाराजी दर्शवली.त्याचे नेहमी तेच राहायचे.....
प्रिती गजभिये(विशाखा)
'आणिक काय हवे' या कथेच उर्वरीत भाग Amazon kindle वर प्रकाशित केलेल्या 'आणिक काय हवे ?'या कथासंग्रहात उपलब्ध आहे.
प्रितीजी, स्रि कशी घाणीच्या बैलासारखे जुंपुन कष्ट करुन घराचे नंदनवन फुलविते.. याचे सुंदर शब्दांकन.. 🙏😊
ReplyDelete