करोना
'जीवनात काही शाश्वत नाही हेच शाश्वत आहे'
जगणे कसे मजेत चालले होते.
करीयर,आॕफिस,घर,मुले,छोटे मोठे उत्सव यात व्यस्त असलेले आयुष्य आज अकस्मात अस्तव्यस्त झाले
जग फार जवळ आले,फार जवळ आले याची गुर्मी बाळगणाऱ्या अख्ख्या जगाला करोनाने चपराक लगावली
जग जवळ आणण्यात गुंतलेले आपण
एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करु लागलो
दूरवर एका देशात आलेल्या साथीने अख्खे जग आपल्या कवेत घेतले .
यंत्रमानव,artificial intelligence (AI) ,technology .....जग जिंकल्याच्या आविर्भावात वावरणाऱ्यांना एका दिवसात या साथीने जमीनीवर आणले.
महामारी...काही वर्षातून कोणत्या ना कोणत्या साथीतून येणारी
महामारी आली कि त्याच्यावर लस शोधा
काही वर्षांनी दुसरीच अशी साथ येते
कि ज्यावर लस नाही.
तुम्ही कितीही गुर्मीत राहा.
आपल्याला जमीनीवर आणण्याचे काम कोणत्या ना कोणत्या रुपात होतच राहते.
पुढच्या १०,२० वर्षाचे planning करणारे आपण उद्या काय होणार सांगू नाही शकत आहोत.
दूरदेशी गेलेल्या पिलांना वापस घरट्याने बोलविले.
'गड्या आपूला गाव बरा' हे कालानुरुप भाबडे वाटत असले तरी
सुरक्षित राहण्यासाठी घराशिवाय पर्याय नाही.
सगळे वातावरण उदास, मरगळलेले,अस्वस्थ.विध्सव्स होणे काय असते याचा जवळपास तीन पिढ्या सोबत अनुभव घेत आहेत.
जीवन कसे surprises देते आणि ते कसे सकारात्मक घ्यायचे हे सगळे शिकतील या अनुभवातून.
जगण्यातला जिवंतपणा हरवला.
आयुष्यात आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी हरवल्या.
लग्न,वाढदिवस,वास्तुशांती संमेलन....यातून मिळणाऱ्या सुखद आठवणी(ज्या आठवणी लोकं जन्मभर पुरवतात) बाद झाल्या.
आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात कुणी साथ देईनासे झाले.
ज्या परीक्षेसाठी चार चार वर्ष अभ्यास केला ,त्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या.
अर्थात सध्या सगळ्यांना इतर वेळी महत्त्वाच्या वाटणाऱ्या या गोष्टी सध्या गौण वाटत आहेत.
करोनाने जीवाचे मोल समजवले आपल्याला.
गरीब-श्रीमंत,जात,धर्म ,देश ... फेविकाॕल का जोड असणाऱ्या या भींती फक्त एखादी साथच ओलांडू शकते.
काही दिवसांनी,महिन्यांनी कदाचित् सर्व normal होईलही.
पण बरेच काही हरवले जाईल तोपर्यंत
यालाच नियती म्हणत असावेत.
जगावर राज्य करण्यासाठी आसुसलेल्या, आपण संपणार आहोत हे वारंवार विसरणाऱ्या
माणसाला जमिनीवर ठेवायला अधूनमधून असे आसुड घेऊन ती येतच राहणार वेगवेगळ्या रुपात. (कधी मानवी चूकीच्या रुपात) अचानक,पूर्वकल्पना न देता,गुढपणे.
तिचा खेळ अगम्य आहे.
प्रीतीदिप
सुरेख लिहिलेय वा👍👍
ReplyDeleteधन्यवाद मंगेश
Deleteखरंय ! आई-वडील आणि मुलांचा संवाद घालून दिला ह्या करोनाने
ReplyDeleteआभार
DeleteKhup mast
ReplyDeleteआभार
Deleteछान शंब्दाकन,व सत्य परीस्थीती चे सुबक शब्दाकंन
ReplyDeleteVaishali joshi ....मस्तच ग विशाखा ...।
ReplyDeleteवैशाली धन्यवाद
Deleteखुप छान लिहले ग नियतिचा फेरा यालाच म्हणू शकतो.....jyoti
ReplyDeleteआभार
Deleteविशाखा...छान लिहितेस...लिहीत रहा...मंजु
ReplyDeleteधन्यवाद मंजु
DeleteAgadi kharay. ShikaylaS haw hyatun
ReplyDeleteआभार
Deleteएकदम खरय - आशिष चोखानी
ReplyDeleteमुग्धा देशपांडे : एकदम वास्तव , भावस्पर्शी
ReplyDeleteभयंकर, पण वास्तव !
ReplyDeleteसुंदर लेखन ! तुझ्यातला हा गुण आम्हाला दिसला , मग कोरोनाला पण धन्यवाद द्यावे लागतील त्याबद्दल .