अश्रु दुःखाचे आणि आनंदाचेही (Guest author - शशिकांत कुळकर्णी)
नुकतेच लोकडाऊन उठल्यामुळे जवळच्याच चांभाराकडे चप्पल /बूट दोन्हीच शिवून घ्यावे म्हणून गेलो तर तो तिथे योग्य अंतर राखून दोन ग्राहके आधीपासूनच उभी होती त्यांचे काम आधी होणार अन मग माझा नंबर लागेल म्हणून मी सुद्धा सुरक्षित अंतर ठेऊन उभा राहिलो पाऊस पडून गेला होता चिखलाचे साम्राज्य असल्याने त्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत होती तेवढ्यात दोन महिला साधारणतः पन्नाशीच्या आसपास,, थोडी घाई करीत होत्या मी माझ्या ऐवजी तुम्ही आधी शिवून घ्या असे म्हणून थोडा बाजूला झालो अन त्या दोघीच्या गप्पा अनायासे कानावर पडत होत्या त्या ऐकत होतो : ती टेस्ट निगेटिव्ह आली बर का लेकीची.
असे सांगणारी ती माता हळूच डोळ्याच्या कडा पुशीत होती बहुधा सांप्रत पसरत असणाऱ्या कोरोना बद्दलच त्या बोलत होत्या , दुसरी तिला म्हणाली अग निगेटिव्ह आलीय न टेस्ट मग रडतेस कशाला, आता पोटातील बाळाला काही संसर्ग नसला म्हणजे मिळवले याचा अर्थ ती मुलगी गरोदर होती !! तशी ती म्हणाली अग बाई हे आनंदाश्रू आहेत !!!
त्या दोघी चपला शिवून निघून गेल्या मी पण माझे काम आटोपून घरी परतत होतो।।।। त्या ओल्या डोळ्यांविषयी विचार करीत होतो.......................... म्हणजे मनुष्य प्राणी दुःखात तर रडतोच पण सुखात देखील आसवे साथ सोडीत नाहीत फक्त त्याचे लेबल बदलते "आनंदाश्रू" !!
खरे तर डोळ्यातून पाझरणाऱ्या या द्रवरूप पदार्थावर तर कितीतरी सिनेगीते / गझल / आणि कविता यांचे भांडार उभे राहिले आणि बऱ्याच लेखकाचे पोट भरण्याचे साधन ठरले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही . असे म्हणतात बऱ्याच माता भगिनींचे ते तर इप्सित साध्य करण्याचे शस्त्र आणि शास्त्र आहे. अर्थात हा प्रकार विवाद्य ठरेल म्हणून त्यावरच जास्त लिहिणे टाळतो !!
परंतु स्त्री हि पुरुषांच्या तुलनेत अधिक संवेदनशील असते म्हणून कदाचित या आसवांचं "मैत्र" जरा जास्तच असते।।। पुरुष बहुधा आपले अश्रू लपवण्यात प्रवीण असतो अन्यथा तो म्हणतो "ये आसू मेरे दिल कि जुबान है "........ अगदी सतत अश्रुपात होण्याची वेळ आलीतर "नित्याचे मडे त्याला कोण रडे" !!
वर नमूद केल्याप्रमाणे *"कवी /शायर यांना तर हे आसवं म्हणजे अभिव्यक्तीसाठी मिळालेले देवदत्त वरदानच !!"*
वेदनेमुळे आलेल्या अश्रूंना फुंकर घालून लौकर थांबवता येते परंतु संवेदनेमुळे आलेले अश्रू हे मनावर झालेल्या प्रहार /आघातावर अवलंबून कधी कधी अव्याहत टप टप करीत राहतात आणि खूपच खोलवर प्रहार झाला असेल तर अश्वत्थाम्याच्या जखमेसारखे सतत झरणारे अश्रू तर त्या व्यक्तीची आणि कधीकधी आसपासची विमनस्कता वाढवणारे ठरतात !! एकूणच या अश्रूंना ओळखणारी नजर असेल तर त्याचे परिणाम खूप
चांगले अन कधी वाईट सुद्धा होऊ शकतात .मनात गच्चं भरून आलेले ढग हे डोळ्यावाटे बरसून गेल्याशिवाय फ्रेश किंवा हलके वाटत नाही
अगदी नऊ महिने पोटात वाढवणाऱ्या मातेला या काळात विविध कारणाने आसवांची साथ असते परंतु अपत्य जन्माच्या नन्तर येणारे अश्रू बऱयाचदा त्यासर्व वेदनांना धुवून टाकण्यात यशस्वी ठरतात या लेकरांच्या विविध बाललीला पाहत कधी कधी येणारे आसवं हि आनंदाची अनुभूती देणारे सुद्धा ठरतात हीच लेक उपवर झाली कि तिच्या कन्यादानानंतर त्या मातेसोबत तो पिता देखील अत्यंत सहजतेने आपल्या आसवांना वाट मोकळी करून देतो तेव्हाच जो माहोल असतो त्यावेळी अनेक परिवार जण आपले डोळे पुसत असतात
हीच नववधू विरहात जेव्हा मूक अश्रू ढळू लागते तेव्हा तिच्या सख्या तिची चेष्टा करतात आणि तिचे इप्सित साध्य झाल्यानंतर सुद्धा अनेक जणी
आनंदाने तिच्या आनंदांत सहभागी होऊन पुन्हा आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या करतात.अजूनही जेव्हा कधी "दाटून कंठ येतो , किंवा बाबूल कि दुवायें लेती जा " असे आर्त सूर कानी पडताच बरीच बाप मंडळी सुद्धा ढेपाळतात एखादी व्यक्ती मृत पावल्यावर जर त्या परिवारातील कुणी रडलंच नाही तर त्याला/तिला आधी रडू द्या म्हणजे तो /ती मोकळा होईल अशी वाक्ये जेव्हा कानावर पडतात तेव्हा ही अश्रूंची परिणामकारकता विचार करायला भाग पडते. "आंसू भरी है ये जीवनकी राहे ....। " असे सांगत जगणारा कधीकधी नकारात्मक च सांगतोय का? असे वाटून जाते
"आंख में आसू लेकर मुस्कुराना ...."हि तर जीवनातील एक कठीण परीक्षा असते अन यातून यशस्वीरीत्या पास होणारा जेव्हा "अश्रूंची झाली फुले " असे म्हणतो तेव्हा त्याच्या /तिच्या आयुष्यातील इतिकर्तव्यता च सफल झाल्याचे द्योतक असते असे म्हणावयास हरकत नाही !!!
Blog आवडला ना.
मग subscribe/follow करा.
Facebook page
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
खूप अप्रतिम लेखन,अन दाखले.
ReplyDeleteकधी कधी हृदय रुदन करतं पण डोळ्यातून एक टिपूस पण येत नाही, अश्रू आटलेले असतात.
............मोहिनी
सुरेख,दर्जेदार लिखाण.
ReplyDelete