मनातली मोरपिसे---कथा क्र. ६

वाचक मंडळी, 
विषय एक - कथा अनेक.
यावेळी विषय आहे जीवाला पिसे लावणारी--- मनातील मोरपिसे.
मनातील मोरपिसे...शब्दातच किती मधुरता,मुलायपणा आणि तरलता जाणवते. प्रत्येकाच्या मनात किमान एकतरी मोरपीस  असते.जीवापाड जपलेले.
ते मनातले मोरपीस पूर्ण  व्हावेच हा अट्टाहास नसतो पण पूर्ण झालेच तर त्यासारखी तृप्तताही नसते. 
काहीजणांचे मोरपिसे फुलतात,काही जणांचे विरतात आतल्याआत.

मनातली मोरपिसे-कथा क्र.६


गिरीश आणि निलिमा नवदाम्पत्य . त्यांच नुकतंच लग्न झालेलं . दोघेही स्वभावाने अगदी मनमिळावू.
 विशेष म्हणजे त्यांच्या प्रेमाला घरी स्वीकारून लग्नबंधनात अडकले होते. 
गिरीशच्या घरच्यांचाही स्वभाव सरळ आणि  साधी माणसं होती . म्हणजे निलिमाला  सासरी असल्याचे कधीच  जाणवत नसे.
त्यांच्या लग्नाला महिना पालटला होता आणि आपल्या नवीन संसाराची स्वप्न ते रंगवत होते . 
त्यांचे पहिले सगळे सण-समारंभ अगदी सुरळीत पार पडले . 

असे आनंदाचे दिवस जात होते. गिरीशचे रोजचं रुटीन ठरलेलं, ऑफिस आणि निलिमाला वेळ देणे . 
गिरीशला ऑफिस मधुन लवकर घरी  यावे आणि निलिमा सोबत वेळ घालवावा वाटे.
निलिमाची घरकाम, वाचन वगैरे चालु होतं . असे करत त्यांचे गुलाबी दिवस मजेत सरत होते.

त्यांच्या लग्नाला आता दोन वर्षे पुर्ण झाली परंतु अजूनही निलिमाची कुस काही उजवत नव्हती . 
तिला एक बाळ हवं होतं.
कोणाचं तान्हं बाळ पाहिलं की तिच्या मनात 
कालवाकालव व्हायची.
मनातल्या मनात ती बाळाला गोंजारायची, त्याचे पापे घ्यायची.
बाळाच्या स्पर्शासाठी निलिमा आणि गिरीश आसुसले होते.
पण हे 
हे तान्हं मोरपीस हुलकावणी देत होते.

आजुबाजूचे, शेजारी- पाजारी, नातेवाईक मंडळी, त्यांना साध्या बोलण्यातून, हसण्यावरी किंवा  टोमण्यातून 
बाळावरुन बोलत असत.  निलिमाला गंमतीचे बोलणे सुद्धा सलायचे इतकी ती हळवी झाली होती.
 गिरीश त्या गोष्टीला हसण्यावारी नेत असे. आणि निलिमाला मात्र ते प्रश्न नेहमीच सतावत असत, तिला हे बोलणे जिव्हारी लागत होते. 

कोणतीही स्त्री स्वतः चा अपमान सहन करेल पण बाळाच्या उणिवेतुन नवऱ्याचा होणारा अपमान ती नाही सहन करू शकत.

निलिमाचेही हेच झाले.
निलिमाआणि गिरीश दोघांनीही बाळाच्या प्रश्नावर विचार करून डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. घरच्यांचाही विचार घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनीही चांगला प्रतिसाद दिला, मुल होईल अशी आशा निलिमाला दिली. थोडा काळ का होईना,  घरात समाधानाचे, आनंदाचे दिवस आले होते.

परंतु, कितीही प्रयत्न करून त्याला काही यश येत नव्हतं. बराच काळ लोटला पण मुल काही होत नाही, ही चिंता आता घरात चांगली जाणवु लागली. मेडिकल ट्रीटमेंट सोबतच निलिमा आणि तिच्या सासुबाईनी उपास, नवस वगैरे करून  झाले, परंतु या प्रश्नावर काही उत्तर मिळेना. शेवटी डॉक्टरकडे चांगली चिकित्सा केली आणि पॉझिटिव्ह विचारांना जवळ करून, देवाची उपासना केली. 

नऊ वर्षानंतर तिच्या पदरी यशाचं फळ पडलं, त्यांना बाळाची चाहुल लागली.  घर अगदी आनंदात न्हाऊन निघालं होतं. जणु काही स्वर्ग दोन बोटे उरले होते त्यांना. असा आनंद गिरीश आणि निलिमाच्या  चेहऱ्यावर दिसत होता. आता बोलणाऱ्यांची  तोंड बंद झाली. आणि देव कृपेने त्यांच्या घरी नऊ वर्ष नऊ महिन्यांनी छोटी परी,  मुलगी आली . लक्ष्मी चे रुप घेऊन आली.  
घरात सगळेच खूप आनंदी होते .
इतकी प्रतिक्षा करून मिळालेलं मातृत्व होतं निलीमाला.
बाळाचं पालन पोषण खुप काळजीने करत होती, खुप जपत होती तिला.
पण बोलणारे काही थांबत नाहीत. त्यांना काहीतरी कारणे पाहिजेच असतात.
 बोलणाऱ्यांची कुजबुज अजुनही चालुच, म्हणजे 

मुलगी झाली. वंशाला दिवा नाही. इतके वर्षानंतर कुस उजवली, आता पुढे काही होते की नाही. 

अशी काहीशी बडबड शेजारीपाजारी ऐकायला येत होती. निलिमाच्या सासुबाई चे कान भरण्याचा प्रयत्न होई. परंतु या सर्व गोष्टीवर कानाडोळा करत गिरीश आणि निलिमा यांचे कुटुंब खूप सुखी होते. आनंदी होते. त्या बाळाच्या सांभाळ करण्यात त्यांचे दिवस कुठे जात होते काही कळत नव्हते. 
देवाची कृपा म्हणावी किंवा आश्चर्य म्हणावे दोन वर्षानंतर परत ती आई होण्याचा दुसऱ्यांदा आनंद अनुभवायला तिला मिळाला.
थोडी काळजी वाटत होती, खूप वाट पाहायला लागली तिला, आई म्हणुन हाक मारणाऱ्याची.
मुलगी सुखा वर तिचे  खुप प्रेम होते. सुखामुळेच तिला आईपण मिळाले होते. एवढं प्रेम ती दुसऱ्या अपत्यावर करू शकेल की नाही ?
की या सुखापासून दुरावेल, अशी सुरवातीला वाटणारी धास्ती हळूहळू कमी होत गेली. दोन्ही तिचेच अपत्य राहणार होते.
 तिच्या उपास-तापास पुजेचा , उपासनेचे फळ तिला मिळाले असावे. असं ती विचार करत होती. आणि  दिवस भरल्यानंतर  तिला मुलगा  झाला. आता तिचं  एक पुर्ण कुटुंब तिच्या डोळ्यासमोर उभं होतं. म्हणतात ना देवाला मागतो एक आणि मिळते बरंच काही,  असं काहीस तिच्या आयुष्यात घडलं.  

तिचे मोरपीस आता पुर्ण झाल्यासारखी तिला वाटत होते .  तिच्या  मनातील मोरपीस सगळ्या रंग छटा घेऊन फुलले आणि आयुष्य पार सगळं बदलुन गेलं. 

           


                लेखिका   ...... पल्लवी जोशी.....


आवडली का कथा?
आवडल्यास आमचा blog follow करा.
आमचे फेसबुक पेज जीवनगाणे सप्तसुरांचे like करा.

एक डिसेंबरपासून नवीन कथामालिका येत आहे.
विषय एक- कथा अनेक
वाचक मंडळी तुमचा अभिप्राय आणि प्रतिसाद अपेक्षित आहे.
तुम्ही आम्हाला तुमच्या मनातील एखादा विषय सुचवू शकता.

Comments

  1. खुप छान पल्लवी,
    दमदार entry.
    अभिनंदन 🌹

    ReplyDelete
  2. खुप छान लेख पल्लवी... मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

शब्दपर्ण

समर्पण-९

महिलादिन विशेष