महिलादिन विशेष

 समाज व्यवस्थेत स्त्रीच्या हुशारीला तिच्यातील कलागुणांना अफाट बुद्धिमत्तेला तिच्या अस्तित्वाला दुय्यम स्थान देऊन समस्त स्त्री जातीवर कित्तेक वर्ष अन्याय केला आणि म्हणूनच एक द्रष्टया व्यक्तीने म्हणजेच आंबेडकरांनी केले .

 समाजविघातक अनेक रूढी परंपरांना तिलांजली दिली महिला विधेयक मंजूर करून समस्त स्त्रीजातीला सन्मानित केले आणि तिला उडण्याचे बळ दिले.

"स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी."

असे हृदयात अमृताचा झरा घेऊन जगणारे एक अस्तित्व समाजातील काही धर्ममार्तंडांनी त्यांना त्यांच्या विकासाची दारे बंद केले खरंच कधी कधी माझ्या मनात विचार येतो त्या काळातही बुद्धिमत्ता असणारच पण त्यांना माणूस म्हणून फुलण्याचे विकसित होण्याची अधिकारच नाकारले होते. पिढ्यानपिढ्या तिचे विश्व म्हणजे फक्त रांधा वाढा उष्टी काढा ..आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी लागणारे सर्व गुण ठासून भरलेले असताना देखील तिला पुरुषप्रधान संस्कृतीने कधीही तिचे माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार दिले नाहीत त्यामुळे समस्त स्त्री जातीचे खूप नुकसान झाले पण त्याहून अधिक समाजव्यवस्थेचे झाले कित्येक  बुद्धिमान स्त्रिया अशाच जगल्या आणि गेल्या .तरीही अशा या समाजव्यवस्थेत काही स्त्रिया बंड करून उठलल्याआणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले त्यामुळेच आपल्याला त्या काळातील काही बुद्धिमान स्त्रिया ज्ञात झाल्या पण त्या  हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच. त्यांनी पुढील काळातील स्त्रियांना प्रेरणा दिली. खूप बळ दिले आणि स्त्री एक एक पाऊल पुढे टाकत स्वतःला सिद्ध करू लागल्या .आणि आज पुरुषांच्या बरोबरीने जीवन जगताना दिसत आहे. त्याना मानाचा मुजरा करावासा वाटतो खरंच त्या काळातील काही स्त्रियांनी समाजाचा विरोध पत्करून स्वताला सिद्ध केले नसते तर आज आपल्याला मैत्री गार्गी सारख्या विदुषी आणि  महदंबा, बहिणाबाई सारख्या महान कवयित्रीचा वारसा लाभला असता का? त्यांच्यासारख्या हजारो स्त्रिया धर्म व्यवस्थेचा समाजव्यवस्थेचा बळी ठरल्या असते. आणि म्हणूनच स्त्रीच्या वेदनेला न्याय देण्यासाठी ज्योती सावित्री च्या रुपाने जन्म घेतला असावा आणि प्रशिक्षित करून तिला उंच आकाशात उडण्याचा सामर्थ्य दिले त्यांनी अनेक पिढ्या पुसणारी स्त्रीक्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता कोणीही आणि कितीही लिहिले तरी कधी ही कवेत न येणारी ती तसेच समुद्र घागरीत मावत नाहीत तशेच कधीही शब्दात न मावणारं अस्तित्व.
 सध्या आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करत आहोत प्रत्येक स्त्री काही दिवस अगोदरच नवरात्री ची तयारी करण्याची लगबग सुरु करते घराचा कोपरान् कोपरा स्वच्छ करतानाच मनाचे कोपरे ही शुद्ध करते आणि त्यात भक्तीचा दरवळ भरते नऊ दिवस उपवास करुन त्या आदिशक्तीची उपासना करते तिचा वावर कुठे नाही असे नाही घरात देवीची उपासना आकाशात उडते चंद्रावर जाते इतकी सामर्थ्यवान स्त्री पुरुष प्रधान संस्कृती ला कळली नसेल का? कदाचित काही अतिहुशार धर्ममार्तंडांना तिच्या सामर्थ्याची जाणीव झाली असावी आणि म्हणूनच त्यांनी तिच्यावर अनेक बंधने घातली असावी अर्थात असे मला वाटते समाज तिला देवीचे रूप मानतो आणि तिच्यावर अनेक बंधने घालतो देवीच अस्तित्व हे कधीही आणि कुणालाही न समजणारा असा आहे म्हणूनच तिला शक्ती समजून तिची पूजा करतो स्त्रियांना दुय्यम स्थान का असा मला प्रश्न पडतो समाजाने पुरुष प्रधान संस्कृती झपाट्याने बदलत आहे ही एक आशावादी गोष्ट आहे.
असे असले तरी काही ठिकाणी आजही एकविसाव्या शतकात स्त्री स्वाभिमानाने जगू शकत नाही .आजही पुरुषाला स्त्री म्हणजे मालकी हक्काची वस्तू आहे असे वाटते कुठल्यानाकुठल्या मार्गाने तो तिला नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो .त्याची झालेली चिडचिड मनस्ताप तो स्त्रीवरच काढतो अशा ठिकाणी स्त्रीच्या स्वाभिमानाचा चकनाचुर होतो कमावती स्त्री असली तरी आर्थिक स्वातंत्र्य क्वचितच सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पुरुषालाच असा हा काही अलिखित पण जणू काही सहज वापरातला नियम स्त्री मात्र घर आणि नोकरी असेल तर नोकरी आणि घर या दोन्ही भूमिका समर्थपणे पेलत नोकरी करणारी असेल तर सतत घराच्या आणि कुटुंबाच्या उत्कर्षाचा ध्यास घेऊन तीचा नवरा मुले घर नातेवाईक ऑफिस बॉस काम अशा कितीतरी ठिकाणी ती लीलया वावरतेच की पण स्वतःला समजून घ्यायला तितकासा वेळ देऊ शकत नाही. खरंच स्त्रीच आयुष्य म्हणजे एक वर्तुळअसते.
दिवसभर तीनशे पासष्ट दिवस कुटुंबासाठीती सतत कष्ट करते. म्हणजे एक प्रकारे समाज व्यवस्थापनाचे काम करते कारण प्रत्येक कुटुंब हा समाजाचा एक घटक आहे आणि तो ती व्यवस्थित शिक्षित आणि सुसंस्कृत करते म्हणजेच एका अर्थाने समाज घडविण्याचे काम करते मला नेहमी प्रश्न पडतो अशा  या बहुआयामी व्यक्तिमत्त्व व्यक्तिमत्वाला काय हवे असते थोडासा सन्मान पण इथे तर पदोपदी अपमान च तीला सहन करावा लागतो.आभाळभर प्रकाशाची तिला गरज नसते . आयुष्य उभं करण्यासाठी तीला फक्त एक कवडसा हवा असतो .तीची स्वतः चा पण....... समाजात निर्भयपणे जगता येत नाही ही खरंतर तिची नाहीतर समाजव्यवस्थेची खूप मोठी शोकांतिका आहे या जगात सर्वकाही करु शकणारी स्त्री ला डोक्यावरचा पदर उचलून घ्यायला लवकर जमले नाही.  आहे.कारण कित्येक  वर्ष स्त्री ला तो उचलण्याचे धाडस झाले नाही. असे वाटते ज्या पदरात संस्काराच्या शालीनतेच्या आणि सभ्यतेच्या नावाखाली किती तरी स्त्रियांच्या कलेला त्यांच्या योग्य तेला आणि बुद्धिमत्तेला तिलांजली दिली जाते. पण हार मानेल ती स्त्री कसली ती लढत राहिली व्यवस्थेविरुद्ध स्वतःच्या हक्कांसाठी पण तीचे मुक हंबर्डे तिच्या बाबतीत बोथट झालेल्या समाजाला कसे ऐकू येणार.तरीही ती काही अंशी नाही तर बऱ्याच अंशी तिने यशही मिळवले आहे.
             समस्त स्त्री जातीला समर्पित

                              

                      सिंधु व्हटकर-सोनवणे

आम्ही  शब्दपर्ण वेबसाईट आणत आहोत.
आमचे सर्व साहित्य  त्या वेभसाईटवर उपलब्ध असेल.
तिथे तुम्ही पाठावलेले साहित्य  publish करण्यात येईल.

Comments

  1. वाह आप्रतिम ग ....

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिले ग

    ReplyDelete
  3. वाह...जबरदस्त 👌👌

    ReplyDelete
  4. खुप यथार्थ सत्यता.
    अप्रतिम लेखन.
    Happy women's day

    ReplyDelete
  5. छान लिहिलंय
    Keep It Up and
    Happy Women's Day

    ReplyDelete
  6. Thanks to all Sindhu vhatkar sonawane

    ReplyDelete
  7. मस्तच लिहीले ...

    ReplyDelete
  8. Thanks to all Sindhu vhatkar sonawane

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जीवनगाणे-सप्तसुरांचे

निरोप--- एक शाश्वत सत्य.

पूर्वसंकेत---एक गूढ

आरसा मनाचा

शब्दपर्ण