Posts

अधीर मन झाले....... (लेखिका मोहिनी पाटनुरकर ---राजे)

Image
आज दिवसभर आभाळ खूप दाटून आलं होतं. दाही दिशा अंधारल्या होत्या. नेहमीपेक्षा खूप लवकर दिवस मावळतीला गेला असं वाटलं.  तसे श्रावण यायला अवधी होता, पण आषाढातचं श्रावण सरी बरसणार असं वाटत होते.  ‌ ‌ संध्याकाळ झाली सखुनी विठोबा जवळ आणि तुळशीजवळ दिवा लावला. ‌ तिने व्याकुळ होऊन विठोबाच्या मूर्तीकडे पाहिले. डोळे भरून आले तिचे. विठोबाला तिच्या डोळ्यातली तळमळ दिसली असेल ??? ‌ ‌ आज आषाढी एकादशी सखू हरी दोघांचाही उपास. दोघांनी हरिपाठ म्हंटला.  फराळाचे ताट वाढून घेतले.  ‌.      ' त्या' लाही वाढले.  फराळ आटपला. आवरून झालं. दोघेही शांत नुसते बसून राहिले. दोघे काहीच बोलत नव्हते. झोपायला अजून अवकाश होता,  तेवढी रात्र झालेली नव्हती. ‌ आषाढी असूनही दोघेही उदास, अस्वस्थ होती.. घरात दोघेच हरी आणि सखु , पिंपळगाव एक छोटसं त्यांचं गाव. शेतीव्यवसायातून उदरभरण होते. एक मुलगा तो सैन्यात भरती . ‌दोघांचीही विठ्ठलावर प्रचंड भक्ती. ‌ ‌ काळ्याकुट्ट आभाळांनी त्यांचं काम सुरू केलं . सरी बसायला लागल्या, त्यासोबतच सखूच्या डोळ्यातही आसवांच्या धारा वाहायला लागल्या. ‌शांत वातावरणात ...

अश्रु दुःखाचे आणि आनंदाचेही (Guest author - शशिकांत कुळकर्णी)

Image
नुकतेच लोकडाऊन उठल्यामुळे जवळच्याच चांभाराकडे चप्पल /बूट दोन्हीच शिवून घ्यावे म्हणून गेलो तर तो तिथे योग्य अंतर राखून दोन ग्राहके आधीपासूनच उभी होती त्यांचे काम आधी होणार अन मग माझा नंबर लागेल म्हणून मी सुद्धा सुरक्षित अंतर ठेऊन उभा राहिलो पाऊस पडून गेला होता चिखलाचे साम्राज्य असल्याने त्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत होती तेवढ्यात दोन महिला साधारणतः पन्नाशीच्या आसपास,, थोडी घाई करीत होत्या मी माझ्या ऐवजी तुम्ही आधी शिवून घ्या असे म्हणून थोडा बाजूला झालो अन त्या दोघीच्या गप्पा अनायासे कानावर पडत होत्या त्या ऐकत होतो : ती टेस्ट निगेटिव्ह आली बर का लेकीची. असे सांगणारी ती माता हळूच डोळ्याच्या कडा पुशीत होती बहुधा सांप्रत पसरत असणाऱ्या कोरोना बद्दलच त्या बोलत होत्या , दुसरी तिला म्हणाली अग निगेटिव्ह आलीय न टेस्ट मग रडतेस  कशाला, आता पोटातील बाळाला काही संसर्ग नसला म्हणजे मिळवले याचा अर्थ ती मुलगी गरोदर होती !! तशी ती म्हणाली अग बाई हे आनंदाश्रू आहेत !!!  त्या दोघी चपला शिवून निघून गेल्या मी पण माझे काम आटोपून घरी परतत होतो।।।। त्या ओल्या डोळ्यांविषयी विचार करीत होतो..........

रकमीची भाकर ---(Guest author-ज्योती रामटेके)

Image
 मी आमासीक गंगीकड जाउन येतो पटकन अन् मंग भाकरी बनवतो. कायले चालली व , नीरा उडांरत रायत काल त्या सखू वैनीकड गेली अन तटीसाच बसुन रायली.अटीसा माया पोटात  नीरा कावळे  बोंबले.तटीसा मस्त  खायखुदाळा केला अन आली मंग माहारानीसारखी , आली न मस्त  पसरली .मले सकायचे कुटके खा लागले बापा .. बापा लयच नवल आहे.मी तुमाले अशी हनहन करतो काय.मी जरास कुठ जाच नाव तोंडातून  काढल की बातच जीवावर येते  तुमच्या ,मी नीरा घरात घुसून  रायतो मी घरात रायली कि तुमाले लय बर वाटते अव ...रकमा तुया कायजीपोटी सांगितलं  तुले आन् तू भाकरबी टायमार नाई बनवतं. सबन समजते मले .तुमाले मायी लयच कायजी आहे मले माईत आहे ना बापा किती कायजी आहे त मले काई झाल त तुमाले त बरच आहे जाय बर...तुले साद बोलन बी समजत नाई साद्या मनान सांगतो , तुले उरफाट लागते . बोलाचा बी धाक आहे माया जीवाले जातो मी...दीवा बत्ती करुन ठुजा  नाईत रहान त्या टी वी त डोक्स खुपसुन अव त अटीसाच बारा वाजवत काय. जाय लवकर मले बी घंटाभर सुकान राउ दे बर बापा...मायामुळ भांडन होउन रायले  ना घरात तीकडच रायतो मी.मायावाला लय तरास आ...

विहीर

Image
लग्नाला पाच सहाच महिने झाले आणि संदीपची बदली कृष्णापूरला झाली.तो एका ग्रामीण बँकेत मॕनेजर होता. संदीप आणि  रचना कृष्णापुरलाला आले. त्या गावात येताच रचनाला प्रसन्नतेचा अभाव असलेले ते गाव मुळीच आवडले नाही. ती संदीपला तसे म्हणालीसुद्धा. पण संदीपला तसे काही जाणवले नाही. एक भाड्याने छोटेसे घर घेऊन त्यांनी संसार थाटला. संदीप आॕफिसमध्ये गेला कि रचना एकटी कंटाळायची पण करणार काय? तो आॕफिसमधून घरी आला कि दोघे जरा गावाबाहेर फिरुन यायचे. आज  जवळच असलेल्या एका शेताकडे दोघेही फिरायला गेले.अमावस्येची रात्र होती.  शेत ओसाड वाटत होते. सगळे सामसुम होते. रचनाला कसलीतरी भीती वाटत होती.परत जाऊ या म्हणून ती संदीपच्या मागे लागली.संदीप तिला हसायला लागला. तुला भुताची खूप भीती वाटते,मला माहित आहे. रचना,तुला कितीदा सांगितले भुत वगैरे काही नसते.सगळे मनाचे भास आहेत. फिरु या जरा वेळ. किती आल्हाददायक वाटत आहे इथे. फिरता फिरता अंधारायला लागले.शेताच्या जरा आतल्या बाजूला एक विहीर दिसत होती. संदीप तिथपर्यत जाऊ म्हणून रचनाच्या मागे लागला.पण अंधार झाला होता गाव नवीन होते म्हणून रच...

दिंडी

Image
🚩🚩    दिंडी 🚩🚩    Guest author - मोहिनी पाटनुरकर (राजे) घरचा दिवाळी सण आटोपल्यावर आम्ही चारही बहिणी माहेरी आलो......सगळ्या जणी जातात तशा.  हा आमचा दर दिवाळी चा  कार्यक्रम आहे. आम्ही आणि माहेर दोन्हीही एकमेकांची वाट बघत असतो. माहेरी आलो आणि दुसऱ्याच दिवशी रामप्रहरी दुरून मृदंग आणि टाळ वाजवल्याचा आवाज आला, सोबतच काही जणांचा भजनाचा पण सूर ऐकू आला. 'ती'आमच्या गावातली 'दिंडी' होती. एका विशिष्ट देवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या तीर्थक्षेत्री किंवा मंदिरी, दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग,भजने गात नामस्मरण करीत पायी जाणार्‍या लोकांच्या जमावाला दिंडी म्हणतात. कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे. दिंडी दिसली कि आपसूकच आम्ही बहीणभाऊ आमच्या बालपणात हरवतो. दिंडी बघता बघता लहानपण आठवतो. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा दिंडीचा कालावधी असतो. एका मंदिरातून सुरुवात करून आमच्या पूर्ण परिसरात फिरून ही दिंडी त्याच मंदिरात शेवट करते. कार्तिक महिना असतो हा. पहाटे पहाटे बऱ्यापैकी थंडीला सुर...

स्पर्श

Image
वेदा चे सकाळीच  आज ...क्षुल्लक कारणावरून समीरशी ..वाजले होते ....लग्न होऊन  नुकताच महिना झाला होता ...अन्...त्यात हे भांडण ....आईची आठवण येऊन दिवसभर  तिला खुप रडायला  येत होते .....असाच ...दिवस .कंटाळवाणा गेला होता  ..उदास  होउन ..वेदा अशीच बाल्कनीत ऊभी होती .....अचानक .. तिला ..एक स्पर्श जाणवला ...अन् ..पाठोपाठ सुगंधही ....समीर तिच्या केसांत ...गजरा माळत होता ....त्याच्या त्या ..गजऱ्याच्या .स्पर्शाने ..तिने एकदम ..वळून समीरकडे बघितले ..आणि दोघेही ..एकदम ..जोरात हसायला लागले .....दिवसभराची उदासी ....एका स्पर्शाने ..कुठल्या कुठे पळून गेली होती . किशोर ला कसे आवरावे ..ते आजुबाजूच्यांना  कळत नव्हते ..छोट्याशा accident चे  निमित्त होऊन ..ते आज सकाळीच हे जग ... सोडून निघुन  गेले होते ...किशोर   किती तरी वेळी ...त्यांचा हात हातात घेऊन बसला होता ...त्यांचा शेवटचा स्पर्श ..अनुभवता ...त्यांचे आधीचे  ...कितीतरी ..प्रेमळ स्पर्शांच्या  आठवणीत ..बुडून गेला होता .....सायकल  शिकवताना ...त्यांचा तो आश्वासक स्पर्श .... वर्गात चांगले...

प्रिय वरुण

Image
प्रिय हो. शब्द बरोबरच वाचला तू. प्रिय आहेस म्हणून तर सगळे गुन्हे माफ आहेत तुला. आज तुझे लग्न आहे.तुझ्या बहिणीने उर्मीने सांगितले. माझे हे  पत्र तुला मिळेस्तोवर आठएक दिवस झालेले असतील तुझ्या लग्नाला. आपले लग्न आठवते का रे तुला? माझ्या  घरच्यांच्या विरोधात जाऊन केलेले. एकदम thrilling experience होता वगैरे म्हणायचास तू. तुझ्या  प्रेमात  वाहवत गेलेली मी माझ्या घरच्यांना शत्रू  समजत राहिली. पण मस्त सुरु होता आपला संसार.म्हणजे अगदीच नजर लागण्यासारखा म्हंटला तरी चालेल. नविन संसार, नवी अनुभूती,एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलो आपण, सगळेच नवीन होते दोघांसाठीही. आताचा  हा तुझा संसार  तसाच सुरु आहे का? आपल्यासारखा? मला आठवते मी इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षाला आणि  तुझे तिसरे वर्ष.  काँलेजच्या अॕन्युअल डे ला मला बघितलेस  आणि  वेडापिसाच झाला तू माझ्यासाठी. मी तुला हो म्हणेपर्यंत मागे मागे होतास. किती बहाणे शोधत राहायचाच मला बघण्याचे,भेटण्याचे. आता आठवून हसू येत आणि  सोबत आसु पण येतात. मला पण तू आवडायला लागला होता.तुझी हुशारी, बोलण्याची ढब, ...

शलाकाची डायरी.....

Image
दिनांक ....... बाबा घरीच जास्त रमायचे. बँकेतून घरी आले कि झाडांना पाणी दे,आमचा दिवस कसा गेला त्याची विचारपूस कर,आईला बँकेतल्या गोष्टी सांग यातच वेळ घालवायचे. बाबांना फिरण्याचीही आवड होती.सगळे मिळून कुठेतरी फिरायला जावे असे त्यांना सतत वाटायचे.पण आईची इच्छा नसायची.आईला विशेष अशी कसलीही आवड नव्हती. स्वयंपाक आणि  घर टापटीप ठेवणे हीच तिची आवडती कामे. पण बरेचदा तिला न आवडणाऱ्या  गोष्टी ती केवळ बाबांना आवडतात म्हणून करायची. बाबा आईला सिनेमाला,नाटक बघायला घेऊन जायचे. घरी आले की आम्हाला समरसून कथानक ऐकवायचे. खूप तद्रुपतेने सांगायचे सगळे. त्यांनी सांगितलेले चित्रवत् डोळ्यासमोर उभे राहायचे. बाबांच्या स्वभावात ओलावा तर आई जरा कोरडी होती. कित्येकदा बाबा आईला काही सांगायचे तिकडेही तिचे लक्ष  नसायचे. बाबा आम्हाला कधीही रागवायचे नाहीत. मी चवथीत असतांना घरी टेपरेकॉर्डर आल्याचे आठवते. बाबा त्यांच्या आवडीच्या गाण्यांची लिस्ट बनवायचे आणि  गाणी रेकाॕर्ड करुन आणायचे. किती छान दिवस होते ते. आम्ही जेवण मिळून करायचो.सकाळी आमची शाळेची तयारी करण्यात बाबा आईला मदत करायचे. घरी नातेवाईक,बाबांचे ...

आणिक काय हवे?

Image
उंबरठा ओलांडून आज  बाहेर पडली मधुरा. का?कशासाठी ओलांडला उंबरठा? लौकिकार्थाने सगळेच तर होते तिच्याजवळ. मग आणिक काय हवे होते तिला? घर सोडण्याचा मनात खूपदा आलेला विचार आज अमलात आणला तिने.चूक कि बरोबर माहित नाही पण तिने यावेळेस मनाने घेतलेला निर्णय  मधुराने मानला. मानला . मनाचे द्वंद्व संपवले आज. विवेकवर खूप प्रेम असूनही उंबरठा ओलांडला तिने. काय नव्हते उंबरठ्याच्या आत जे तिला उंबरठ्याच्या बाहेर मिळणार होते? आणिक काय हवे होते तिला? स्वातंत्र्य ?जिवंतपणा? मधुरा अवखळ,जीवनाचा पूरेपूर आनंद लुटणारी,संगिताची आवड आणि त्यात पारंगत असलेली. फुलपाखरासारखी स्वच्छंद जगणारी,जगण्यात रमणारी.  तीस वर्षापूर्वी माप ओलांडून विवेकच्या घरात आली त्याची जीवनसंगिनी बनून. घरात विवेक,सासरे,एक दीर आणि  एक ननद. विवेक घरातला मोठा मुलगा म्हणून आपसूकच तीही मोठी सून बनली. घरातली मोठी म्हणून जबाबदाऱ्याही जास्त. तिचे माहेर आणि सासर यांच्यातील अंतर लग्नानंतरच्या आठ दहा दिवसातच लक्षात आले तिच्या . या अंतराने लवकरच प्रगल्भ झाली ती. सासरे अधिकारी पण विचार जूनाट. सुनेने पहाटेच उठून दिवसभर कामे करावीत या विचाराच...

शब्दोकें फुल

Image
शब्दोकें फुल अमृता का काव्यसंग्रह  प्रकाशित हुआ आज। उमरके पंद्रहवे सालमें जो सपना देखा था वो आज जाके पूरा हूआ। उसके इस सपनेको पूरे होने में चालीस साल लगे।  घरके लिए, घरवालोकें लिए जो सपने देखे थे वो पूरे किये थे उसने। बचपनसे अमृता प्रितम की चहेती थी वो। उसकी कहानियां पढते पढते इसके मनमें भी  अंदरकी भावनाओकों काव्यरुप देने का सपना खिल रहा था। लेकिन उसके मनमे खिलनेवाले शब्दोकों ना वो काव्यरुप दे सकी ना कागजपें कभी उतार सकी।  उसकी भावना, उसके शब्द जाननेवाला कोई मिला ही नही उसे। उसकी लिखनेकी चाहत कोई समझही नही पाया। रातकों चाँदके प्रकाशमें जो शब्द सजानेके  ख्वाँब वह देखती थी वो सुबह होतेही सुरज के किरणोके  के साथ खत्म हो जाता था। शादीके बाद  लिखूँगी ये सोचके  हमसफर के साथ संसार बसा लिया। हमसफर गुणवान,धनवान लेकिन शब्दोसे अजनबी, शब्दोसे दूर भागता था वो। अमृताके शब्द उसके ह्दय तक पहूँचते ही नही थे। उसके सपनोका मतलब वो समझ ही नही पाता था। अमृताने मनके शब्दोकों बाहर आने ही नही दिया। उनको अंदरही अंदर समीटती गयी वो। शब्द भी बाहर निकलने के लिए कितना रुकते? गय...

आइना मनका (हिंदी)

Image
आजकल आइने में देखनेसे घबराती है वो। चेहरेपर झुर्रीयाॕ देखती है तो उसके  दिलकी धडकने बढ जाती है। सफेद बाल दिखा तो उसको छुपानेकी कोशिशे शुरु होती है। भौहें में एकभी ज्यादा बाल दिखा तो  ब्युटिशियनकी याद आ जाती है। मै बुढी हो रही हूँ..... इस एहसास से डर सी जाती है वो। सोचते सोचते थकीहारी सी वो बिस्तर पर लेट जाती है। और तभी उसको एहसास होने लगता है अंदरसे कुछ याद आने लगता है उसे अरे, मै क्यों इस आइनेके भरोसे बैठी हूँ। मेरे मनका आइना - वो तो मै भूलही गयी हूँ सिर्फ उसमें ही तो मेरा असली चेहरा दिखेगा। और वो मनका आइना टटोलने लगती है। उसमें  दिखती है वो वैसीही नटखट, यौवनसे भरपूर, फुलोकी बौछार देखके खूश होनेवाली। बच्चोको देखकर  खूदके बचपन को याद करनेवाली, रातरानी  के सुगंध से महकनेवाली, पक्षियों की किलकिलाहट सुनकर  चहकनेवाली, गाने सुनते समय गानेमे,उसके शब्दोमें डूब जानेवाली, श्याम को सबकी अधीर मनसे राह देखनेवाली वही अधीरता, जीनेकी वही उमंग,  वही जिंदा दिल इन सबमें कहाँ है  बुढापा? मतलब ये बाहरका आइना झूठ बता रहा है,धोखा दे रहा है अब वो बाहर के आइने की परवाह न...

संपलेली पायपीट

Image
एकाच कारखान्यात काम करणारे सोळा जण. गावाला कामधंदा नाही म्हणून काही दिवसच आधी रोजंदारीसाठी गावावरुन शहरात आले होते. थोडे दिवस पोट भरण्याइतपत पैसे मिळवतात न् मिळवतात तोच ह्या साथीच्या रोगाने त्यांच्या हातून रोजगार हिरावला. हाताला रोजगार नाही म्हणून पोटाला घास नाही घराचे  भाडे द्यायला पैसे नाही. राहायचे कुठे अन् खायचे काय? पोटापुरते पैसे बाजूला ठेऊन बाकीचे गावाकडे पाठवू हा गावावरुन येतांना मांडलेला हिशेब कधी पूर्ण  झालाच नाही.  गावाकडे म्हातारे आईवडील,बायको,बहीण-भाऊ,छोटी छोटी मुले सोडून लांबून रेल्वेच्या तिकिटांसाठीही  कर्ज घेऊन  आलेल्या त्यांना करोनाने परतीची वाट धरायला भाग पाडले. 'शहरात येऊन फक्त पोटापुरता कामधंदा मिळाला  आपली आधार देणारी माणसे गावातच राहिले, आता कामच नाही म्हंटल्यावर इथे पोटाला घास मिळणेही दुरापास्त होणार. आता इथे,शहरात राहणार कसे? इथेच आपल्याला काही झाले तर... आपले गावच बरे. आपली मायेची माणसे वाट बघताहेत. वापस जायला हवे' सगळ्यांच्या मनात हे असेच विचार येत होते. पण जायचे कसे? धनी लोकांसारखी पास बनवून...

शब्दफुले

Image
' शब्दफुले' अमृताचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आज.  वयाच्या पंधराव्या वर्षी बघितलेले स्वप्न फुलायला चाळीस वर्ष लागली तिला. या मधल्या वेळेत घरच्यासोबत,घरच्यांसाठी बघितलेली कित्येक स्वप्ने पूर्ण  केली तिने .      लहानपणापासून अमृता प्रितम आवडती होती तिच्या. तिच्या कथा वाचता वाचता  या अमृताच्या मनात पण भावनांना शब्दरुप देण्याचे स्वप्न रुंजी घालायला लागले. लिहिण्याची  असोशी असलेली ती मनात आलेले शब्द कागदावर उतरवूच नाही शकली कधी. तिला असलेली लिहिण्याची ओढ नाही समजली कुणाला.  रात्री चंद्रप्रकाशात शब्दांसवे बघितलेले शब्दांची स्वप्ने  पहाटे सुर्याच्या किरणात विरत गेली. लग्न झाल्यावर लिहू असे म्हणत जोडीदारासोबत रममाण झाली. जोडीदार साजेसा,गुणसंपन्न पण  काहीसा शब्दांपासून दुरावलेला,अलिप्त. त्याला  तिच्या शब्दांचा,स्वप्नांचा  अर्थ कधी कळला नाही.  मनात उमटलेल्या शब्दांना अंतरंगातून बाहेर येऊच नाही दिले तिने. तिच्या मनातल्या शब्दांचा थांग घेतलाच नाही कुणी. शब्द तरी किती वाट बघणार?   गेले तिला ए...

जीवनगाणे-सप्तसुरांचे

Image
नमस्कार मंडळी मी प्रीती/विशाखा. जीवनगाणे सप्तसुरांचे जीवन गाण्यासारखे सुरात गुंफलेले दुःखाचे गाणे, आनंदाचे गाणे,प्रेमाचे गाणे,रागाचे गाणे,..... सात सुरांसारखे.  रागदारीच्या सरगम सारखे जीवनातही कधी कोमल स्वरांसारखे मागे जावे लागते तर कधी तीव्र स्वरासारखे पुढे . कधी वादी  स्वरासारखे सांभाळून घ्यावे लागते तर कधी संवादी स्वर गवसतात. काही स्वर तर चक्क वर्जित करावे लागतात. आपण कोणते सूर निवडतो आणि त्या सूरांसारखे स्वतःला ला किती बदलतो यावर आपल्या जीवनगाण्याचे रुप अवलंबून असते. जीवनाकडे गाणे समजून बघितले तर चराचरात गाणे दिसेल आपल्याला. वाहणाऱ्या नदीची झुळझुळ,  समुद्राच्या लाटांची गाज, कोसळणाऱ्या  पावसाची टपटप,  वाऱ्याने हलणाऱ्या पानांची सळसळ, पहाट झाली हे सांगणारी   पक्ष्यांची किलबिल चिमणीची चिवचिव, कोकिळेची कुहूकुहू,  भूंग्याची गुणगुण....सगळीकडे गाणी. जन्माला आल्यावर आईने अंगाईगीत गाऊन झोपवलेल्या बाळा सोबत गाणे कायम राहते. काही गाणीवेडे अक्षरशः गाणी जगतात. जीवनातले सूर हरवले तरी जगण्याचा ठेका,नाद कायम असतो त्यांच...

आरसा मनाचा

Image
आताशा आरशात बघतांना धास्तावतो जीव तिचा चेहऱ्यावर एखादी सुरकुती बघून वाढायला लागतात काळजाचे ठोके, एखादा पांढरा झालेला केस लपवावा  म्हणून  धडपडते मन, भुवईत एखादा जास्तीचा केस बघून ब्युटिशियनची appointment  घ्यायला हवी, चंदेरी केसाला काळा रंग द्यायला हवा  याची होते तिला आठवण यौवन संपून म्हातारपण येत आहे  या जाणीवेने अस्वस्थ,उदास  झालेली ती जरा वेळ  पापण्या मिटून  पडण्याचा करते प्रयत्न  पडतो तिच्या  मनात  लख्ख  उजेड. तिच्या वेगवेगळ्या  प्रतिमा दिसायला लागतात तिला अरे, हा मनाचा आरसा विसरलीच होती कि. त्यातच तर तिचे खरे प्रतिबिंब उमटते. तिला त्या आरशात दिसायला लागते  अजूनही यौवनात असलेली ती,  टवटवीत, तारुण्याच्या तरल भावना   जगत असलेली, प्राजक्ताचा सडा बघून तशीच आनंदित होणारी.  मोगरा,चाफ्याच्या गंधाने धुंद होणारी, घराच्या मागच्या बागेत बागडणारी मुले बघून बालपण अनुभवणारी, पक्ष्यांची किलबिल ऐकूण हुरळून जाणारी...... बागेत उमललेली फुले  बघून उमलणारी, निसर्गाव...

नवे आभाळ

Image
कल्पनेच्या पलीकडे  शब्दांच्या    पलीकडे स्वप्नांच्या     पलीकडे  रम्य,मनोहारी, सौंदर्याने परिपूर्ण  असेच काहीतरी असणार अशीच समजूत होती आतापर्यंत. आता अनुभवतोय सगळे सोबत. कल्पनेच्या,शब्दांच्या,स्वप्नांच्या पल्याड काय असते ते. अनाकलनीय,भयंकर काहीतरी सरळ एका रेषेत चालणारे आयुष्य किती बिघडवले  एका साथीने सगळं अधांतरी ,अनिश्चित चाललयं कधी काय होईल  माहित नाही संपूर्ण  जग काळजीत जीवन सुरळीत कधी होईल याची वाट बघत. मनात सगळं सुरळीत होणार की नाही याची धास्ती आधीचे दिवस परत येतीलच  याची शाश्वती नाही.         घराबाहेर जायला बंदी सतत बिझी असणारे माणसे         सगळे कामे सोडून घरात बसलेले       सगळी वाहने बंद  रात्री गजबजलेली ,झगमगणारी शहरे  आज दिवसाही झोपलेली.       आता बीमार झालो तर डाॕक्टरकडे कसे जायचे हे भय         नेहमी वाहनांनी भरलेले रस्ते खाली,  बाहेर आवश्यक कामासाठी गेलोच तर स...

भय इथले संपत नाही

Image
माणसांना पिंजऱ्यात बघितले आहे का? आज जगभरात घरोघरी पिंजऱ्यात माणसे अडकली आहेत. पिंजरा उघडला कि पक्षी आकाशात भरारी घेण्याची धडपड करतो . माणसांची पिंजरे उघडीच आहेत.ती त्यांनीच बनवली आहेत. त्याला स्वतःलाच पिंजऱ्यात राहायचे आहे पिंजऱ्याबाहेर जाण्याचे एवढे भय कशाचे? मृत्यूचे?  स्पर्शाचे? जीवघेण्या करोनाचे? अवकाशात भरारी घेणाऱ्या माणसाला करोनाने जमीनीवर आणले.(अक्षरशः  लोळवले) सर्वत्र मृत्यूचे भय. पिंजऱ्यात कोंडून घेण्याशिवाय पर्याय राहला नाही  माणसाजवळ. सर्वांना सोबत राहता यावे म्हणून सुट्टीची वाट बघणारे आपण आज,उद्या,परवा सुट्टी असुनही किती अस्वस्थ आहोत सर्व ठीक होईल असे मन समजवत आहे पण अंतर्मन मानायला तयार नाही. उद्या काय हादरा बसणार या विचाराने अंतर्यामी  माणूस हादरला आहे. उद्या कदाचित् आपण.....या विचारानेच थरकाप होतोय अंतर्मनाचा. आपण सगळे सध्या एकाच अवस्थेतून जातोय  भयाची अवस्था    सैन्य  सीमांच्या रक्षणासाठी लढतात तेव्हा दोन पावलांवर असणाऱ्या  मृत्यूचे भय त्यांना नसेल? रुग्णाचा साथीचा रोग होऊन आपण क...